सोमनाथ गिते यांना २०२२ व्यसनमुक्ती गौरव पुरस्कार प्रदान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २३ फेब्रुवारी २०२२ । बार्शी । मागील काही वर्षांपासून व्यसनमुक्ती विषयावर लेखन करणाऱ्या सोमनाथ गिते यांना २०२२चा व्यसनमुक्ती गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. समुपदेशन, वर्तमानपत्रं, मासिकं, सोशल मीडिया आदी माध्यमांतून जनजागृती करत समाजात व्यसनमुक्ती चळवळीचे कार्य करण्याचे काम गिते यांनी केले आहे. या कार्याची दखल घेत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व यश मेडिकल फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा ‘व्यसनमुक्ती गौरव पुरस्कार २०२२’ त्यांना देण्यात आला.

बार्शी तालुक्यातील जामगाव येथे झालेल्या व्यसनमुक्ती संमेलनात बार्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शशिकांत भदाने, तर उद्घाटक दिलीप सोलापूरकर हे होते. स्वागतध्यक्ष सुरेश लोमटे, यश मेडिकल फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप तांबारे तसेच डॉ. बी. वाय. यादव, डॉ. पल्लवी तांबारे, डॉ. रामचंद्र जगताप आदी उपस्थित होते.

आपणांस विनंती आहे कि हि बातमी प्रकाशित करावी.


Back to top button
Don`t copy text!