
दैनिक स्थैर्य । दि. २५ फेब्रुवारी २०२२ । फलटण । फलटण तालुक्याच्या शिरपेचात मनाचा तुरा म्हणून काळज गावच्या कन्या आणि ढवळ गावच्या स्नुषा सौ.पुष्पांजली राजू लोखंडे(उपअभियंता, पारेषण विभाग,महाराष्ट्र शासन)यांना सन-२०२२ चा महाराष्ट्र शासन आणि महिला व बालविकास महामंडळ यांच्या वतीने जाहीर झालेला ‘तेजस्विनी कन्या’हा पुरस्कार मा.ना. श्री.सुभाष देसाई ,उदयोग मंत्री, महाराष्ट्र, शासन तसेच महिला व बालविकास मंत्री मा.ना. यशोमती ठाकूर ,राज्यमंत्री श्रीमती अदिती तटकरे आणि शिवसेना नेत्या आणि प्रसिद्ध अभिनेत्री श्रीमती उर्मिला मातोंडकर यांच्या हस्ते आज चर्चगेट,मुंबई याठिकाणी प्रदान करण्यात आला.यावेळी विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराज साहेब) यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या.