दैनिक स्थैर्य । दि. २७ जून २०२२ । मुंबई । अवनी-फेमिनाइन केअर आणि हायजीन स्टार्टअप ब्रँडने त्यांच्या उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीसाठी सबस्क्रिप्शन मॉडेल लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. अवनीच्या उत्पादनांची वाढती मागणी आणि ग्राहकांच्या संख्येला प्रतिसाद म्हणून हे सबस्क्रिप्शन मॉडेल सुरू करण्यात आले आहे.
ग्रँड मॉम्स आणि आयुर्वेदाने प्रेरित होऊन, अवनी मासिक पाळीपासून रजोनिवृत्तीपर्यंत चांगले संशोधन केलेले आणि जागरूक उत्पादने प्रदान करते. अवनी महिलांसाठी मासिक पाळीच्या विविध स्वच्छता उत्पादन जे त्वचेसाठी अनुकूल, पर्यावरणास अनुकूल आणि रसायनमुक्त आहेत अश्या उत्पादनावर सबस्क्रिप्शन देते.
सबस्क्रिप्शनसाठी उपलब्ध असलेल्या उत्पादनांच्या श्रेणींमध्ये मासिक पाळीच्या स्वच्छतेचा नियमित सराव करण्यासाठी आणि त्याच्या वापरकर्त्यांना आणखी परवडेल अशी लोकप्रिय उत्पादने समाविष्ट आहेत. ग्राहक निवडू शकतील असे विविध सबस्क्रिप्शन पर्याय आहेत, जसे की दर महिन्याला किंवा दर २ महिन्यांनी किंवा दर ३ महिन्यांनी वितरणासाठी सदस्यता. नैसर्गिक कॉटन सॅनिटरी पॅड्स (१२ पॅड्स) ची मूळ किंमत जी १.५ पट अधिक लीक शोषून घेते ती रु. २१९/ प्रति १२ पॅड आहे, आणि सदस्यता घेतल्यानंतर द्यावी लागणारी रक्कम १२ पॅडसाठी रु. १३३ इतकी कमी असू शकते.
अवनीच्या सह-संस्थापक श्रीमती सुजाता पवार यांनी सांगितले की, “अवनी येथे आम्हाला आमचे सबस्क्रिप्शन सेवा मॉडेल जाहीर करताना आनंद होत आहे कारण ते आमच्या खरेदीदारांना त्यांच्या गरजेनुसार नियमितपणे खरेदी करण्यासाठी सोयीस्कर, वैयक्तिकृत आणि अधिक स्वस्त मार्गाने सक्षम करेल. हा उपक्रम केवळ महिलांना सक्षम बनवण्यासाठी नाही तर स्वच्छता विधी अधिक व्यवस्थापित आणि प्रभावी बनवण्यासाठी आहे. आम्ही लवकरच इतर सर्व उत्पादनांसाठी देखील अशाच सदस्यता ऑफर लाँच करणार आहोत.”
मासिक पाळी स्वच्छता उत्पादन, वितरण आणि मार्केटिंग स्टार्टअप म्हणून अवनी मासिक पाळीशी निगडीत आव्हाने आणि त्याच्याशी निगडीत असलेल्या निषिद्धांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी सक्रियपणे आवाज उठवत आहे. अवनीने वनग्रीन या पर्यावरणपूरक ई-कॉमर्स ब्रँडशी संलग्न झाल्यानंतर लगेचच अवनीची सदस्यता देवू केली गेली आहे.