अविनाश पवार यांना ‘राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार’ प्रदान

सामाजिक कार्याची दखल; विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव


स्थैर्य, फलटण, दि. ०९ सप्टेंबर : अखिल भारतीय नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे सातारा जिल्हाध्यक्ष अविनाश पवार यांना, त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल श्रीयश एज्युकेशन फौंडेशन सोसायटीतर्फे दिला जाणारा ‘राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

अविनाश पवार हे विविध सामाजिक संघटनांमध्ये कार्यरत आहेत. ते अखिल भारतीय नाथपंथी डवरी गोसावी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वाघ्या मुरळी गोंधळी परिषदेचे प्रदेश समन्वयक, महाराष्ट्र राज्य भटक्या विमुक्त संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष आणि फलटण तालुका कलाकार मंचाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

या पुरस्काराबद्दल त्यांचे विधानपरिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दिपकराव चव्हाण, फलटण बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, गोविंद मिल्कचे संचालक श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर आणि फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी अभिनंदन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!