रक्तदान सेवेसाठी २४ तास उपलब्ध : श्रीरंग जमदाडे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०८ मार्च २०२२ । बारामती । श्रीरंग (भाऊ) जमदाडे मित्र परिवार व श्रीनाथ म्हसकोबा देवस्थान जळोची यांच्या सयूंक्त विद्यामानाने युवा नेते जयदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार ०५ मार्च रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी शहर राष्ट्रवादी चे अध्यक्ष जय पाटील, बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव, उपाध्यक्ष रोहित घनवट, ओबीसी सेल कार्याध्यक्ष नितीन शेंडे,, युवक अध्यक्ष अविनाश बांदल,मा. नगरसेवक अतुल बालगुडे, सौ आशाताई माने ,अमर धुमाळ व प्रताप पागळे,अर्जुन पागळे,,तुषार लोखंडे, प्रवीण माने ,विक्री कर निरीक्षक प्रियांका जगताप भेलके आदी मान्यवर उपस्तीत होते. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, रक्तदान ही चळवळ होणे साठी होत असलेले रक्तदान शिबीर म्हतपूर्ण असल्याचे सर्व मान्यवरांनी सांगितले. रक्तदान च्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासली जावी व कोणासही रक्ताची गरज पडल्यास २४ तास सेवा उपलब्ध असल्याचे आयोजक श्रीरंग जमदाडे यांनी सांगितले.

श्रीरंग जमदाडे मित्र परिवार ,श्रीनाथ म्हसकोबा देवस्थान व श्री संत सावता महाराज तरुण मंडळ , महाकाळेश्वर तरुण मंडळ ,जळोची चे सर्व कार्यकर्ते , पदाधिकारी ,विश्वस्त यांनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले या वेळी १०६ बाटल्या रक्त संकलित करण्यात आले रक्तदान करणाऱ्या युवकांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!