स्थैर्य, खटाव, दि.२४: कोकराळे ता.खटाव येथे सोमवारी सकाळी अवैध्यरित्या चोरटी वाळू वाहतूक करणारे तीन ट्रँक्टर वाळूसह सुमारे 13लाखाचा मुद्देमाल जप्त करून खटाव येथील पाच जणांना औंध पोलिसांनी अटक केली.
दरम्यान औंध पोलीसांनी केलेल्या धडक कारवाई मुळे औंध परिसरात एकच खळबळ उडाली असून अवैध्यरित्या वाळू व्यवसाय करणारांचे धाबे दणाणले आहेत.
याबाबत औंध पोलीस स्टेशनमधून मिळालेली अधिक माहिती अशी, सोमवारी पहाटे 5.30ते 6.30च्या दरम्यान मायणी नजीकच्या येरळा नदी पात्रातून तीन ट्रँक्टर मधून अवैधरित्या वाळू उपसा करून तो कोकराळे येथील घराच्या बांधकामासाठी नेत असल्याची माहिती औंध पोलीसांना मिळताच सपोनि उत्तम भापकर यांच्यासह पोलीस पथकाने कोकराळे येथे सापळा रचून तीन ट्रँक्टर ,दोन दुचाकी गाड्या तसेच तीन ब्रास वाळू असा एकूण 12लाख 82हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या वाळू चोरी प्रकरणी किशोर प्रल्हाद कदम वय 48,दिपक शंकर शिंदे वय 33,अनिल बापू कांबळे वय 31,रजनीकांत शंकर शिंदे वय 31,अक्षय बाळू कांबळे वय 30 सर्व रा.खटाव पाच जणांवर गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केली आहे.
सदर घटनेचा अधिक तपास सपोनि उत्तम भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रशांत पाटील ,पंकज भुजबळ,कुंडलिक कटरे,महेश जाधव ,वाघ, पाटील व पोलीस कर्मचारी करीत आहेत.