ऑडी इंडियाच्या विक्रीत १०१ टक्कयांची वाढ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०४ जानेवारी २०२२ । मुंबई । ऑडी या जर्मन लग्झरी कार उत्पादक कंपनीने आज मागील वर्षाच्या तुलनेत १०१ टक्के वाढीची घोषणा केली आणि ३,२९३ रिटेल युनिट्सच्या उत्तम विक्रीची नोंद केली. ऑडी ई-ट्रॉन ५०, ऑडी ई-ट्रॉन ५५, ऑडी ई-ट्रॉन स्पोर्टबॅक ५५, ऑडी ई-ट्रॉन जीटी, ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटी या पाच इलेक्ट्रिक कार्स आणि पेट्रोल समर्थित क्यू-रेंजसह ए-सेदान्समुळे ही वाढ शक्य झाली. ऑडी ए४, ऑडी ए६, ऑडी क्यू२, ऑडी क्यू५ आणि ऑडी क्यू८ या कार्ससाठी ब्रॅण्डसाठी व्हॉल्यूम सेलर्स आहेत. आरएस व एस परफॉर्मन्स कार्सनी प्रबळ मागणी कायम राखली आणि २०२२ साठी उत्तम ऑर्डरची नोंदकेली आहे.

ऑडी इंडियाचे प्रमुख श्री. बलबीरसिंग धिल्लन म्हणाले, “महामारीची दुर्दैवी दुसरी लाट आणि सेमी-कंडक्टर, वस्तूंच्या किंमती, शिपमेंट आव्हाने  इत्यादींसारख्या इतर जागतिक समस्यांमुळे निर्माण झालेल्या आव्हानांना झुगारून २०२१ मधील आमच्या कामगिरीबाबत आम्हाला आनंद होत आहे. १०१ टक्क्यांच्या वाढीसह आमची विक्री गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पटीहून अधिक आहे. २०२१ हे आमच्यासाठी मोठे वर्ष होते. आमच्या नऊ नवीन मॉडेल्स लाँच करण्यात आल्या आणि आम्‍ही पाच इलेक्ट्रिक कार लाँचसह भारतीय ईव्ही बाजारपेठेत प्रवेश केला. सध्या आम्ही पाच इलेक्ट्रिक कार्स असलेला एकमेव ब्रॅण्ड आहोत. ऑडी क्यू८, ऑडी ए४, ऑडी ए६ व आमच्या आरएस मॉडेल्स यांसारख्या उत्पादनांनी त्यांची प्रबळ कामगिरी कायम राखली आहे आणि आमच्याकडे २०२२ च्या सुरूवातीलाच प्रबळ ऑर्डर करण्यात आली आहे. रिटेलसंदर्भात आम्ही नवीन कार्स शोरूम व वर्कशॉप्स सुरू करण्यासोबत २०२१ मधील आमच्या पूर्व-मालकीच्या कार सुविधांमध्ये दुप्पट वाढ देखील केली आहे.”

श्री. धिल्लन पुढे म्हणाले, “२०२२हे ऑडी इंडियासाठी आणखी एक पॉवर-पॅक वर्ष असणार आहे. आम्ही कस्टमर सेन्ट्रिसिटी, डिजिटायझेशन, प्रॉडक्ट्स व नेटवर्कवर लक्ष केंद्रित करणा-या आमच्या स्ट्रॅटेजी २०२५वर लक्ष केंद्रित करणे सुरूच ठेवू. आकारमान, कामगिरी व इलेक्ट्रिक कार्सच्या आमच्या उदयोन्मुख पोर्टफोलिओसह आम्ही आमच्या ग्राहकांसाठी लग्झरीला पुनर्परिभाषित करणे सुरूच ठेवू. आम्ही देशामध्ये आमच्या पूर्ण क्षमतेने युक्‍त मॉडेल्स सादर करू. आम्हाला आगामी महिन्यांमध्ये प्रबळ कामगिरीचा विश्वास आहे.”

ऑडी इंडिया स्थिर व लाभदायी ब्रॅण्ड म्हणून उदयास येण्याच्या ध्येयाशी एक पाऊल जवळ पोहोचली आहे. प्रत्येक कार्यामध्ये ग्राहकांना प्राधान्य देत ऑडी इंडिया स्ट्रॅटेजी २०२५ वरील प्रबळ भर कायम ठेवेल.

ऑडी इंडियाच्या उत्पादनांच्या विद्यमान श्रेणीमध्ये ऑडी ए४, ऑडी ए६, ऑडी ए८ एल, ऑडी क्यू२, ऑडी क्यू५, ऑडी क्यू८, ऑडी एस५ स्पोर्टबॅक, ऑडी आरएस ५ स्पोर्टबॅक, ऑडी आरएस ७, ऑडी आरएस क्यू८, ऑडी ई-ट्रॉन ५०, ऑडी ई-ट्रॉन ५५, ऑडी ई-ट्रॉन स्पोर्टबॅक ५५, ऑडी ई-ट्रॉन जीटी आणि ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटी आदी कार्सचा समावेश आहे.


Back to top button
Don`t copy text!