दैनिक स्थैर्य । दि. ०३ जानेवारी २०२३ । फलटण । ऑडी या जर्मन लक्झरी उत्पादक कंपनीने मागील वर्षाच्या तुलनेत २७ टक्के वाढीची घोषणा केली आणि ४,१८७ रिेटेल युनिट्सच्या उत्तम विक्रीची नोंद केली. या वाढीचे श्रेय ३ लोकप्रिय लॉन्चना जाते – ऑडी क्यू७, ऑडी ए८ एल आणि ऑडी क्यू३. ऑडी ए४, ऑडी ए६, ऑडी क्यू५, ऑडी क्यू८, ऑडी ई-ट्रॉन व ऑडी ई-ट्रॉन स्पोर्टबॅक ब्रॅण्डसाठी व्हॉल्यूम विक्रेते ठरले. आरएस व एस परफॉर्मन्स कार्ससाठी प्रबळ मागणी राहिली आणि २०२३ करिता उत्तम ऑर्डरची अपेक्षा आहे.
ऑडी इंडियाचे प्रमुख श्री. बलबीर सिंग धिल्लों म्हणाले, ‘‘आम्हाला सेमी-कंडक्टर उपलब्धता, शिपमेंट आव्हाने इत्यादींसारख्या जागतिक समस्येमुळे निर्माण झालेल्या अडथळ्यानंतर देखील २०२२ मधील आमच्या कामगिरीचा आनंद होत आहे. २७ टक्क्यांहून अधिक वाढीसह आमची विक्री सर्व विभागांमध्ये वाढली आहे. २०२२ आमच्या ई-ट्रॉन श्रेणीसाठी प्रबळ वर्ष ठरले. आम्ही आमच्या अंदाजांना मागे टाकत गेलो आणि भारतात लॉन्च केलेल्या पाचही इलेक्ट्रिक कार्सची प्रबळ विक्री केली. भारतातील लोकप्रिय लक्झरी क्यू – ऑडी क्यू३ ने २०२२ मध्ये प्रबळ पुनरागमन केले आणि आम्हाला विश्वास आहे की, या कारचे यश २०२३ आणि त्यापुढील वर्षांमध्ये देखील कायम राहिल. ऑडी ए६, ऑडी क्यू५, ऑडी क्यू७, ऑडी क्यू८, ऑडी ए८ एल यांसारख्या उत्पादनांनी, तसेच आमच्या आरएस मॉडेल्सनी त्यांची प्रबळ कामगिरी कायम राखली. आमच्याकडे २०२३ च्या सुरूवातीलाच प्रबळ ऑर्डर आहे. रिटेलसंदर्भात आम्ही २०२२ मध्ये आमच्या पूर्व-मालकीच्या कार केंद्रांची संख्या २२ पर्यंत वाढवली.’’
२०२२ मध्ये ऑडी इंडियाने भारतातील ग्राहकांसाठी अद्वितीय रिवॉर्डस् उपक्रम – ‘ऑडी क्लब रिवॉर्डस्’ची घोषणा केली. ऑडी क्लब रिवॉर्डस् विशेष उपलब्धता, सेगमेंट-फर्स्ट प्रीव्हीलेजेस् आणि सर्वोत्तम अनुभव देतात. ऑडी क्लब रिवॉर्डस् सर्व विद्यमान मालक (ऑडी अप्रूव्ह्ड: प्लस मालकांसह) आणि ऑडी इंडियाच्या भावी ग्राहकांसाठी खुला आहे. या अद्वितीय रिवॉर्ड्स उपक्रमामध्ये ब्रॅण्ड व पार्टनर ब्रॅण्ड्ससोबतच्या प्रत्येक परस्परसंवादाला पुरस्कारित केले जाते. ग्राहकांना त्यांच्या खर्चांवर पॉइण्ट्स मिळतात आणि हे पॉइण्ट्स कोणत्याही भावी सेवेसाठी व एकाच क्लिकमध्ये विनासायास खरेदीसाठी रिडिम करता येतात.
श्री. धिल्लों पुढे म्हणाले, ‘‘२०२३ ऑडी इंडियासाठी आणखी एक उपलब्धी वर्ष असणार आहे. व्हॉल्युम, परफॉर्मन्स व इलेक्ट्रिक कार्सच्या आमच्या आशादायी पोर्टफोलिओसह आम्ही आमच्या ग्राहकांसाठी लक्झरीला पुनर्परिभाषित करत राहू. आम्ही देशामध्ये आमच्या मॉडेल्सची संपूर्ण क्षमता सादर करू आणि आम्हाला आगामी महिन्यांमध्ये प्रबळ कामगिरीचा विश्वास आहे.’’
ऑडी इंडिया एक शाश्वत आणि फायदेशीर ब्रॅण्ड म्हणून उदयास येण्याच्या आपल्या ध्येयाकडे निर्णायकपणे वाटचाल करत आहे. प्रत्येक मॅन्युवरमध्ये ग्राहकांना प्राधान्य देत ऑडी इंडिया दीर्घकालीन धोरणावरील आपला प्रबळ फोकस कायम ठेवेल. ऑडी इंडियाच्या उत्पादनांची विद्यामन लाइन-अप आहे: ऑडी ए४, ऑडी ए६, ऑडी ए८ एल, ऑडी क्यू३, ऑडी क्यू५, ऑडी क्यू७, ऑडी क्यू८, ऑडी एस५ स्पोर्टबॅक, ऑडी आरएस ५ स्पोर्टबॅक, ऑडी आरएस क्यू८, ऑडी ई-ट्रॉन ५०, ऑडी ई-ट्रॉन ५५, ऑडी ई-ट्रॉन स्पोर्टबॅक ५५, ऑडी ई-ट्रॉन जीटी आणि ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटी.