
दैनिक स्थैर्य । दि. २२ जून २०२२ । मुंबई । ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने आज भारतातील ग्राहकांसाठी अद्वितीय रिवॉर्ड्स उपक्रम – ऑडी क्लब रिवॉर्डसची घोषणा केली. ऑडी क्लब रिवॉर्ड्स विशेष उपलब्धता, सेगमेंट-फर्स्ट प्रीव्हीलेजेस आणि सर्वोत्तम अनुभव देतो. ऑडी क्लब रिवॉर्ड्स सर्व विद्यमान मालक (ऑडी अप्रूव्ह्ड: प्लस मालकांसह) आणि ऑडी इंडियाच्या भावी ग्राहकांसाठी खुला आहे.
ऑडी इंडियाचे प्रमुख श्री. बलबीर सिंग धिल्लों म्हणाले, “आज आम्ही आमच्या ग्राहकांसाठी सेगमेंट-फर्स्ट, लॉयल्टी उपक्रम – ऑडी क्लब रिवॉर्डसच्या लॉन्चसह आमच्या मानव-केंद्रित धोरणाला अधिक पुढे घेऊन जात आहोत. ऑडी क्लब रिवॉर्ड्स अद्वितीय अनुभव, पार्टनर प्रीव्हीलेजेस्, रिवॉर्ड पॉइण्ट्स अशा अनेक गोष्टी देतो. ऑडी इंडियामध्ये आम्ही उत्पादनांपलीकडे विस्तारित होत एक ब्रॅण्ड बनत आहोत, जो जीवनशैली सेवा प्रदाता देखील आहे. आम्ही आमच्या ग्राहकांसाठी मालकीहक्क अनुभवामध्ये वाढ करत आहोत आणि ऑडी क्लब रिवॉर्डसच्या सेगमेंट-फर्स्ट प्रीव्हीलेजेससह आम्ही लक्झरी ऑटोमोबाइल विभागामध्ये बेंचमार्क्स स्थापित करत आहोत. आम्हाला विश्वास आहे की, भारतातील ऑडी ग्राहक लाभदायी लक्झरी अनुभवांची अपेक्षा करू शकतात.”
श्री. धिल्लों पुढे म्हणाले, “ऑडी इंडिया ऑडी कॉन्सीर्ज (कारपलीकडील कोणत्याही लक्झरीसाठी ऑडी कॉन्सीर्जशी संपर्क साधा) यासारखे सर्वसमावेशक व जीवनशैली उपक्रम आणि ‘मायऑडी कनेक्ट’ अॅप्लीकेशनवरील विविध सहभागात्मक मोहिमांसह मागील काही वर्षांमध्ये सेवा क्षेत्रात स्थिर गतीने प्रवेश करत आली आहे. लॉयल्टी उपक्रमांच्या संदर्भात आम्ही मागील वर्षामध्ये विविध भौगोलिक ठिकाणी उपक्रम राबवले आहेत आणि यामधून निदर्शनास आले आहे की, ग्राहक नेहमीच लाभदायी अनुभवांचा शोध घेत असतात. आमच्या नावाशी बांधील राहत आम्ही रिवॉर्डसच्या या अद्वितीय संयोजनालाविकसित केले आहे, ज्यामध्ये कार-संबंधित सेवा व जीवनशैली अनुभवांचा समावेश आहे.”
ऑडी क्लब रिवॉर्ड्ससह ग्राहकांना लक्झरी विशेषाधिकार व अनुभवांचे आनंद मिळतो. हे पुढीलप्रमाणे:
वेलकम प्रीव्हीलेज:- विद्यमान कारमालक, नवीन कार खरेदीदार आणि (ऑडी अप्रूव्ह्ड प्लस)च्या माध्यमातून युज्ड कार खरेदीदार या सर्वांना ऑडी क्लब रिवॉर्ड्स उपक्रमामध्ये सामील झाल्याच्या पहिल्या दिवसापासून प्रीव्हीलेज, वेलकम रिवॉर्ड पॉइण्ट्स व एक्सक्लुसिव्ह पार्टनर वाऊचर्स मिळतात.
ऑडीमध्ये रिवॉर्ड्स कमवा – ग्राहकांना प्रत्येकवेळी खरेदी केलेल्या उत्पादनावर (यामध्ये मर्चंडाइज, अॅक्सेसरीज, कार लाइफ उत्पादने जसे सर्विस पॅकेजेस व एक्स्टेण्डेड वॉरंटी यांचा समावेश) ऑडी रिवॉर्ड पॉइण्ट्स मिळू शकतात, ऑथोराइज्ड सर्विस सेंटर किंवा शोरूममध्ये सर्विस मिळवू शकतात, ऑडी शॉपवर ऑनलाइन शॉपिंग करू शकतात, विद्यमान ऑडी एक्स्चेंज किंवा अपग्रेड करू शकतात, ‘मायऑडी कनेक्ट’वरून पार्टनर उत्पादने व सर्विसेस खरेदी करू शकतात आणि इतर अनेक गोष्टी करू शकतात.
पार्टनर्सकडून रिवॉर्ड्स मिळवा – पार्टनर सर्विसेस व उत्पादनांसह गोल्फिंग, लक्झरी आदरातिथ्य व प्रवास, गिफ्टिंग, अॅक्सेसरीज, मल्टी-ब्रॅण्ड रिटेल अशा गोष्टी ‘मायऑडी कनेक्ट’ अॅप्लीकेशनवरून खरेदी केल्यानंतर ऑडी क्लब रिवॉर्डसच्या रूपात लाभ देतील. ग्राहक सूचीबद्ध सहयोगी ब्रॅण्ड्सकडून ऑनलाइन खरेदींवर ऑडी क्लब रिवॉर्डसच्या रूपात जवळपास १५ टक्के कमावू शकतात.
रिफरल रिवॉर्ड्स – ग्राहकांना ‘मायऑडी कनेक्ट’ अॅप्लीकेशनच्या माध्यमातून मित्राला रिफर केल्यास अतिरिक्ल लाभ मिळू शकतो. ही रिफरल यंत्रणा एका क्लिकसह रिफरल लिंक्सच्या निर्मितीसह पूर्णत: डिजिटल व त्रासमुक्त आहे. या लिंक्स व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, टेक्स्ट मॅसेज किंवा साधे ईमेल अशा आवडीच्या मॅसेजिंग व्यासपीठावर रेफरीसह शेअर करता येऊ शकतात. ही यंत्रणा रेफरीने पुढाकार घेतला आहे की नाही आणि टेस्ट ड्राइव्ह किंवा ऑडी खरेदी केली आहे की नाही याबाबत रिफररला पारदर्शक माहिती देखील देते.
रिडीम पॉइण्ट्स – ऑडी ग्राहक अनेक ऑडी इंडिया उत्पादने, सर्विसेस किंवा एक्सक्लुसिव्ह लक्झरी पार्टनर लाभांसाठी रिवॉर्ड पॉइण्ट्स रिडीम करू शकतात.
पार्टनर बेनीफिट्स / प्रीव्हीलेजेस – ग्राहक ऑडी कॉन्सीर्ज-नेतृत्वित क्यूरेटेड अनुभव, एक्सक्लुसिव्ह हॉलिडेज,लक्झरी शॉपिंग अशा गोष्टींच्या माध्यमातून अद्वितीय लक्झरीचा अनुभव घेऊ शकतात. यामध्ये विशेष आदरातिथ्य भागीदार प्रॉपर्टीमध्ये निवास किंवा क्रूझ अथवा प्रायव्हेट जेटमध्ये स्टायलिश प्रवास यांचा समावेश असू शकतात. काही सूचीबद्ध भागीदार ब्रॅण्ड्स आहेत- ट्रूफिट अॅण्ड हिल, ओबेरॉय हॉटेल्स, मॉण्ट ब्लँक, लक्झरी चार्टर्स बाय एव्हियॉन प्राइव्ह आणि इतर अनेक.
ऑडी प्रॉडक्ट अॅण्ड सर्विस अॅडवाण्टेज: ग्राहकांना अनेक विशेष सदस्य उत्पादने व सर्विसेससह ‘मायऑडी कनेक्ट’ अॅप्लीकेशनवर कमावलेल्या रिवॉर्डसच्या सुलभ पारदर्शक व्ह्यूचा लाभ मिळतो, जे ऑडी इंडिया उत्पादन किंवा सर्विस खरेदीवर वापरता येऊ शकतो. ऑडी क्लब रिवॉर्ड्स सदस्यांना विशेष प्रीव्ह्यूज आणि आधुनिक मोहिम व ऑफर्सची उपलब्धता मिळेल.