लिलाव प्रक्रिया 18 फेब्रुवारीला, ठिकाण अद्याप अनिश्चित; माेटेराच्या नावाची चर्चा जाेमात


स्थैर्य, मुंबई, दि.२३: काेराेना महामारीच्या संकटाने गतवर्षीच्या आयपीएल स्पर्धेच्या आयाेजनात अनेक अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे याच आव्हानात्मक परिस्थितीतून धडा घेतलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आता यंदाच्या १४ व्या सत्रातील आयपीएल स्पर्धेच्या आयाेजनाची जाेमात तयारी सुरू केली. यासाठी पुढच्या महिन्यात १८ फेब्रुवारी राेजी लिलाव प्रक्रिया हाेणार आहे. मात्र, अद्याप याचे ठिकाण निश्चित झालेले नाही. याची लवकरच घाेषणा करण्यात येईल, अशी माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली. मात्र, ही लिलाव प्रक्रिया माेटेरा स्टेडियमवर आयाेजित केली जाणार असल्याचीही जाेरदार चर्चा आहे.

आयपीएलच्या आयाेजनाची रंगीत तालीम आता बीसीसीआय इंग्लंडविरुद्ध कसाेटी मालिकेतून करणार आहे. या चार कसाेटी सामन्यांच्या मालिकेच्या यशस्वी आयाेजनावर बीसीसीआयचा भर आहे. यातूनच आयपीएल आयाेजनाचा मार्ग अधिक सुकर हाेणार आहे. येत्या ५ फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार कसाेटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात हाेईल. त्यामुळे या कसाेटी मालिकेच्या आयाेजनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Back to top button
Don`t copy text!