कराड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालकडून जप्त वाहनांचा लिलाव


दैनिक स्थैर्य । दि. ११ जून २०२२ । सातारा । मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांतर्गत जप्त केलेल्या 11 वाहनांचा जाहीर ई-लिलाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, कराड येथे 16 जून 2022 रोजी सकाळी 11 ते सायं. 4 वाजेपर्यंत ठेवण्यात आला आहे. वाहने उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, कराड येथे आवारात दि. 13 जून ते 16 जून 2022 या कालावधीत कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध आहेत, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, कराड कार्यालयाने कळविले आहे.


Back to top button
Don`t copy text!