बेवारस व गुन्ह्यात जप्त केलेल्या वाहनांचा ११ ऑक्टोबर रोजी फलटणमध्ये लिलाव : पोलीस निरीक्षक भारत किंद्रे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०६ ऑक्टोबर २०२१ । फलटण । फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये बेवारस व गुन्ह्यात जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव फलटण येथे दि. ११ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आलेला आहे, अशी माहिती फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी दिली.

जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बंसल यांच्या आदेशाने फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये असणाऱ्या बेवारस व गुन्ह्यामध्ये जप्त केलेल्या वाहनांचा जाहीर लिलाव दि. ११ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. लिलावापूर्वी आपली मालकी सिद्ध करून आपले वाहन घेऊन जायचे आहे त्यांनी लिलावापूर्वी कागतपत्रासह उपस्थित राहून आपली मालकी सिद्ध करावी. वाहनांची यादी फलटण शहर पोलीस स्टेशनमधील सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. लिलावामध्ये भाग घेणाऱ्यांकडे स्क्रॅप लायसन्स असणे आवश्यक आहे. त्यासोबतच पंधरा हजार रुपये अनामत रक्कम भरणे सुद्धा गरजेचे आहे, असेही पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!