दैनिक स्थैर्य । दि. २९ जून २०२३ । मुंबई । भारतातील सर्वात मोठे ऑनलाइन ट्रॅव्हल टेक व्यासपीठ इझमायट्रिपडॉटकॉमने मिड-इअर हॉलिडे सीझनसाठी पर्यटकांकरिता विशेषरित्या क्यूरेट करण्यात आलेला ब्रॅण्ड डिल्सचा मार्की बकेट ब्रॅण्ड बझारअंतर्गत आकर्षक ऑफर्स आणल्या आहेत. या मर्यादित कालावधीच्या ऑफरदरम्यान ३० जून २०२३ पर्यंत इझमायट्रिपसह प्रवास बुक करणाऱ्या ग्राहकांना प्रतिष्ठित सहयोगी ब्रॅण्ड्सकडून वाऊचर्स मिळतील. हे विशेष प्रमोशन इझमायट्रिपच्या ग्राहकांचा विश्वास व निष्ठेला प्रशंसित करते, ज्याचा ग्राहकांना अपवादात्मक मूल्य व आनंददायी सरप्राइजेज प्रदान करण्याचा मनसुबा आहे.
डिल इझमायट्रिपशी संलग्न प्रतिष्ठित ब्रॅण्ड सहयोगींसोबत उत्साहवर्धक सहयोग करते, ज्यामधून अविश्वसनीय डिल्स व सूट प्रदान करण्यात आल्या आहेत. ग्राहक आकर्षक ऑफर्सच्या श्रेणीचा लाभ घेऊ शकतात, ज्यामध्ये फक्त १ रूपयामध्ये ४५-दिवस गाना प्लस सबस्क्रिप्शन, द मॅन कंपनीकडून अतिरिक्त ३० टक्के सूट (बॉडी स्प्रे वगळून), जेबीएल उत्पादनांवर फ्लॅट १५ टक्के सूट आणि नेटमेड्सकडून ३ महिन्यांचे एनएफएम सदस्यत्व यांचा समावेश आहे. तसेच नॉईज, लॅक्मे सलून, वेकफिट, वाऊ स्किन सायन्स, स्कायबॅग्ज, पॉकेटएफएम, बीअर्डो, कॅप्रीस बॅग्ज, स्किव्हिया अॅण्ड क्लोव्हिया, अजिओ आणि फार्मईजी यांसारख्या प्रतिष्ठित ब्रॅण्ड्सकडून उत्पादनांवर व सेवांवर सूटचा देखील आनंद घ्या. या आकर्षक ऑफर्स मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहेत, तर मग ब्रॅण्ड बझार डिल्सच्या मर्यादित कालावधीदरम्यान आकर्षक बचती व अनुभवांमध्ये सामावून जाण्याच्या संधीचा आनंद घ्या.
इझमायट्रिपचे सह-संस्थापक श्री. रिकांत पिट्टी म्हणाले, ‘‘आम्हाला आमच्या बहुमूल्य ग्राहकांसाठी ट्रॅव्हल सरप्राइज म्हणून आमचे मिड-इअर ब्रॅण्ड डिल्स पॅकेज ब्रॅण्ड बझार सादर करण्याचा आनंद होत आहे. इझमायट्रिपमध्ये आम्ही ग्राहकांना अपवादात्मक प्रवास अनुभव व अतिरिक्त मूल्य प्रदान करण्याप्रती कटिबद्ध आहोत. ब्रॅण्ड बझारसह आमचा प्रतिष्ठित ब्रॅण्ड्सोबत सहयोग करत आणि विशेष सूट देत त्यांचा प्रवास बुकिंग्ज अनुभव अधिक लाभदायी करण्याचा मनसुबा आहे. आम्ही सर्व प्रवास उत्साहींना (पर्यटकांना) या अद्भुत संधीचा फायदा घेण्याचे आणि इझमायट्रिपसह नवीन ठिकाणांचा शोध घेण्याचे आवाहन करतो.’’
या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी इझमायट्रिपसह विमाने, हॉटेल्स, कॅब्स, बसेस, हॉलिडेज अशा त्यांच्या प्रवासांची बुकिंग करणे आवश्यक आहे. बुकिंगनंतर त्यांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर कूपन कोडसह ईमेल मिळेल. ‘रिडिम नाऊ’ बटनावर क्लिक करत ते विशेष ऑफर्सचा आनंद घेऊ शकतात. प्रमोशन नवीन व विद्यमान ग्राहकांसाठी वैध आहे आणि इझमायट्रिपची वेबसाइट, मोबाइल साइट, अँड्रॉईड अॅप व आयओएस अॅपच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकते.