फलटणमध्ये गजानन सुझुकीमध्ये दिवाळी सणानिमित्त दुचाकी खरेदीवर आकर्षक ऑफर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. 19 ऑक्टोंबर 2022 । फलटण । फलटण येथील गजानन सुझुकीमध्ये दिवाळी सणानिमित्त सर्व बाईक व स्कुटरवर विशेष ऑफर ठेवण्यात आली आहे. यानिमित्त मोटारसायकल एक्सचेंज खरेदीवर सात हजार रुपयांचा एक्सचेंज बोनससह 1 अधिक 4 चा इन्शुरन्स तसेच तीन वर्षांची एक्स्टेंड वॉरंटी मोफत मिळणार आहे. तसेच नविन खरेदीवर पाच टक्के कॅश बॅकसह फक्त दोन हजार बावीस रुपयांचे लो डाउनपेमेंट भरुन नविन सुझुकी खरेदी करण्याची सुवर्णसंधी देण्यात येत आहे. याशिवाय सुझुकी अ‍ॅव्हेन्स 125 सीसी गाडी खरेदीवर आकर्षक ट्रॅव्हल बॅग व एक्सेसरीज मोफत मिळणार आहे. नविन सुझुकी व्ही-स्ट्रॉम एसएक्स 250 सीसी मोटारसायकल खरेदीवर सहा हजार 999 रुपयापर्यंतचे आकर्षक ब्रँडेड रायडिंग जॅकेटसह इतर फायदे मिळणार आहेत.

तसेच नामवंत फायनान्स कंपन्यांमार्फत कमीत कमी कागदपत्रांद्वारे 6.99 टक्के व्याजदराने 95 टक्क्यांपर्यंत तात्काळ कर्ज आणि पाच वर्षांपर्यंत ऐच्छिक वॉरंटी उपलब्ध आहे. अशा प्रकारे ग्राहकांना सुझुकी खरेदीवर 30 हजार रुपयापर्यंतचा फायदा मिळणार असून सर्वांनी गजानन सुझुकी शोरुमला भेट देउन आपले मनपसंद वाहन बुक करावे आणि विशेष ऑफरचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक सचिन शेळके यांनी केले आहे.

गजानन सुझुकीने बीएस-6 ची सर्व सुझुकी मॉडेल्स ग्राहकांसाठी उपलब्ध केली आहेत. यामध्ये अ‍ॅक्सेस 125 सीसी, अ‍ॅव्हीन्स 125 सीसी अशी मॉडेल्स व एफआय व एबीएस सिस्टीमसह एसईपी व एसओएस टेक्नॉलॉजीमध्ये उपलब्ध आहेत. या स्कूटरमध्ये टर्न बाय टर्न नेव्हिगेशन, कॉल, एसएमएस, व्हॉटअप अलर्टस, मिस्ड कॉल अलर्ट आणि कॉलर आयडी, स्पीड एक्सीडिंग अलर्ट, फोन बॅटरी, लेव्हल डिस्प्ले आणि ईटीए अपडेटस या सर्व बाबींची माहिती चालकास डिजीटल मीटरने मिळते.

सुझुकी कंपनीकडून अ‍ॅक्सेस 125 सीसी, अ‍ॅव्हीन्स 125 सीसी या मध्ये आकर्षक कलर्स आले आहेत. नविन ऑलराउंडर अ‍ॅव्हीन्स 125 सीसीमध्ये मोठी डिकी स्पेस, 64 किलोमीटर मायलेज, फ्रंट पॉकेट व आरामदायी लेग स्पेस यामुळे अ‍ॅव्हीन्स 125 सीसी सर्व तरुण तरुणींसाठी अत्यंत सोयीची ठरते. गजानन सुझुकीने गेले 14 वर्षात 34 हजार पेक्षा अधिक ग्राहकांना सेवा दिली आहे. पश्चिम महाराष्ट्रात सुझुकीचे नामांकित डिलर असा असा नावलौकिक मिळवला आहे. सुझुकीतर्फे उत्कृष्ठ परफॉर्मन्ससाठी अधिक वेळा पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी गजानन सुझुकी फलटण येथील जिंती नका येथील गजानन सुझुकीच्या शोरूममध्ये किंवा 8600020932/33/34/38 या दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!