दैनिक स्थैर्य । दि. २७ मार्च २०२३ । मुंबई । मराठी पारंपरिक सण गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयवूमी एनर्जीने आपल्या एस वन, जित एक्स आणि एस वन लाईट या सर्व वाहनांवर आकर्षक सवलतीची घोषणा केली आहे. ही आकर्षक सवलत योजना २९ एप्रिल २०२३ पर्यंत उपलब्ध असणार आहे. १० हजार पेक्षा जास्त ग्राहक संख्या असलेला हा ब्रँड ई-मोबिलिटीच्या जगात झपाट्याने प्रसिद्ध होत आहे. विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेली उत्पादने ही परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देण्याचा कमानीचा मानस आहे.
आयवूमी शोरूममध्ये, एस वन, जित एक्स, आणि एस वन लाईटसह वाहने ७० हजार ते ९१ हजार ९९९ पर्यंत कमी किमतीत ग्राहकांसाठी सवलतीत उपलब्ध केली जात आहे या सवलतीमध्ये अॅक्सेसरीज आणि इन्शुरन्सची तरतूद समाविष्ट आहे. स्लीक आणि आधुनिक आयवूमी जित एक्स १०० टक्के भारतीय बनावटीची आहे. आणि आता एआयएस १५६ प्रमाणपत्रासह, थ्री फेज १ अंतर्गत अधिक सुरक्षित आहे. जित एक्स ची स्टायलिश आणि मिनिमलिस्ट डिझाईन निश्चित आहे. नवीन डिझाइन उत्पादनांच्या एकूण सौंदर्यात भर घालत असून त्यामुळे ही वाहने प्रीमियम म्हणून ओळखली जातात.
यावर भाष्य करताना, आयवूमीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विन भंडारी म्हणाले की, “आमची उत्पादने ग्राहकांचे जीवन सुधारण्याच्या उद्देशाने स्थानिक पातळीवर डिझाइन आणि उत्पादित केली जातात. आयवूमी ही एक उत्पादक कंपनी आहे जी सतत ग्राहकांच्या आवडी निवडीकडे लक्ष देते. त्यामुळे सवलती आणि ऑफर देत असताना, आम्ही आमच्या ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहने वापरण्याच्या आणि कमी कार्बन फूटप्रिंट्स सोडण्याच्या वचनबद्धतेसह गुढीपाडवा साजरा करण्यासाठी पुढाकार घेत आहोत. अशा प्रकारे हा सण साजरा करताना आनंद होत आहे आणि वापरकर्त्यांना आनंदाच्या भावनेने आणि समाधानाच्या झगमगाटाने भरलेल्या वातावरणात पारंपारिक नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छासह आयवूमी ग्राहकांचे समाधान सुनिश्चित करण्यासाठी उत्कृष्ट ग्राहक सेवा आणि बॅटरीवर ३ वर्षांची विश्वासार्ह हमी देखील प्रदान करते.