ट्रेल्सच्या दि ग्रँड ट्रेलियन सेलमध्ये सुगंधी ब्रँड्सवर आकर्षक सवलती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २१ डिसेंबर २०२१ । मुंबई । सुट्टीचा हंगाम सुरू झालेला असताना तुम्हाला तुमच्या आवडीच्या लक्झरी सुगंधाचा आनंद घ्यायचा असल्यास ट्रेलच्या ग्रँड ट्रेलियन सेलकडे वळा. या सेलचा आज अखेरचा दिवस असून यामध्ये लोकप्रिय सुगंधी ब्रँड्स- जसे कॅल्विन क्लीन, डीकेएनवाय, मायकेल कोर्स, टॉमी हिलफिगर, मर्सिडीझ बेन्झ आणि डेव्हिड बेकहॅम यांच्यावर जवळपास ७० टक्के इतकी मोठी सवलत दिली जाईल.

ग्राहक इतरही अनेक आकर्षक ऑफर्सचा जसे ‘डील्स ऑफ दि डे’ आणि ‘फ्लॅश सेल्स’चा फायदा घेऊ शकतात आणि फॅशन, आरोग्य आणि कल्याण, सर्वोत्तम सुगंध, ब्युटी, ग्रूमिंग आणि पर्सनल केअर वर्गवारींमध्ये ट्रेल शॉपमध्ये १००० पेक्षा अधिक ब्रँड्सवर ८० टक्क्यांपर्यंत सवलत मिळेल.

ट्रेलने इन-अ‍ॅप चलन ट्रेल कॅशची नवीन संकल्पना (भारतीय रूपयांच्या समकक्ष) आणली. ट्रेलकडील या खास घटकामुळे वापरकर्त्यांना व्हिडिओ पाहणे, अ‍ॅपवर मित्रांना आमंत्रित करणे, ट्रेल शॉपवर खरेदी करणे आणि त्याबदल्यात त्यांना ट्रेल कॅशचा वापर करून अ‍ॅपवर खरेदी करणे शक्य होते. या मूल्यघटकामुळे त्यांना आपल्या आवडीच्या ब्रँड्सवर अतिरिक्त सवलती मिळवणेही शक्य होईल.


Back to top button
Don`t copy text!