एटीएम फोडण्याचा प्रयत्न जागरूक नागरिकांमुळे फसला; पोलिसांकडून सिनेस्टाइल पाठलाग, पण चोरटे पसार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २९ नोव्हेंबर २०२१ । लोणंद । लोणंद शहरातील बॅक ऑफ महाराष्टचे एटीएमची चोरी करण्याचा प्रयत्न जागरूक नागरीक व पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. चोरट्यांच्या वाहनाचा पोलीसांनी सिनेमा स्टाईल पाठलाग केला पण चोरटे पसार झाले.

लोणंद शहरातील रेस्ट हाऊस जवळ पुणे – सातारा रोडवरबँक ऑफ महाराष्ट या बँकेचे एटीएम आहे. आज रविवार दि.28 रोजी पहाटे 4 च्या सुमारास निळ्या रंगाच्या स्कार्पिओ मधुन आलेल्या चार अज्ञात चोरट्यांनी आरसीसी इमारतीच्या गाळ्यामध्ये असणारे एटीएमचा डिसप्ले फोडला.

डिसप्ले फोडतानाचा आवाज झाल्याने समोरच रहात असलेले सागर शेळके व सचिन पानवकर या युवकांच्या काही तरी गडबड असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी त्वरित सपोनि विशाल वायकर यांना फोन केला. या दरम्यान लोक जागे झाल्याचे पाहील्याने चोरटयांनी पलायन केले. काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चोरट्यांनी पलायन करताना पोलीसांना चकवा देण्यासाठी गाडी प्रथमता निरा रोड , त्यानंतर शिरवळ रोड त्यांनंतर पुन्हा घटनास्थळा समोरूनच फलटण रोडकडे नेली .सपोनि विशाल वायकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सिनेमा स्टाईलने स्कार्पिओचा फलटण रोडने पाठलाग केला परंतु चोरटे फरार होण्यात यशस्वी झाले.
जागरुक नागरीकांच्या सतर्कतेमुळे व पोलीसांच्या तप्तरतेमुळे चोरटयांचा एटीएम फोडुन चोरी करण्याचा डाव फसला. याबाबत फिर्याद देण्याची प्रक्रिया सुरू असुन पोलीसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी तीन पोलीस पथके रवाना केली आहेत.

घटनास्थळी पोलीस उपअधिक्षक तानाजी बरडे यांनी भेट दिली
जागरूक नागरीक सागर रामचंद्र शेळके व सचिन शरद पानवकर यांचे कौतुक केले जात आहे.
या बाबतची फिर्याद सुरज दिनकर साळुंखे वय 30 वर्षे व्यवसाय नोकरी रा . मांडवे ता.माळशिरस यांनी लोणंद पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असुन असुन पुढील तपास सपोनि विशाल वायकर करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!