पाचगणीतील टेबल लॅन्ड स्टॉल धारकांच्या प्रश्नाचे भांडवल करण्याचा काही लोकांचा प्रयत्न; स्टाॅल संघटनेच्या वतीने मुख्याधिकाऱ्याना निवेदन


दैनिक स्थैर्य । दि.२२ जानेवारी २०२२ । पाचगणी । पाचगणी येथील टेबल लॅन्ड स्टॉल धारकांच्या प्रश्नाचे भांडवल करून त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याने टेबललॅंन्ड स्टाॅल संघटनेच्या वतीने पाचगणी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्याना निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की आम्ही या द्वारे जाहीर करतो की, टेबल लॅन्ड स्टॉल धारक संघटनातर्फे मुख्याधिकारी पाचगणी नगरपरिषद यांना दि. १८ जानेवारी रोजी निवेदन देण्यात आले होते. त्यावर मुख्याधिकारी यांनी आम्हाला सहकार्याचे आश्वासन दिले आहे. ते वेळोवेळी आम्हाला सहकार्य करीत असतात. काही लोक आमच्या टेबल लॅन्ड स्टॉल धारकांच्या प्रश्नाचे भांडवल करून त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरी आमच्या संघटनेचा व सभासदांचा कुठल्याही राजकीय पक्षाचा संबंध नाही. आमचे प्रश्न आम्ही शासकीय दरबारी मांडण्यास व सोडवण्यास समर्थ आहोत. तरी मुख्याधिकारी नगरपरिषद यांना या निवेदनाद्वारे जाहीर करीत आहोत. निवेदनावर अध्यक्ष हॅड्री जोसेफ, उपाध्यक्ष जावेद डांगे, सचिव अविनाश चोपडे, आशोक सोनावने, नामदेव चोपडे, भानुदास चोपडे, अविनाश भोसले आदींसह ३३ स्टाॅल धारकांच्या सह्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!