
दैनिक स्थैर्य । 29 एप्रिल 2025। फलटण । आळजापुर येथे गावातील काही राजकीय लोकांनी घेतलेल्या सभेत संतकृपा उद्योग समुहाचानिषेध करून संतकृपा उद्योग समूहाची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती संतकृपा उद्योग समूहाचे शिल्पकार विलासराव नलवडे यांनी दिली.
याबाबतची अधिक माहिती अशी, आळजापुर येथील निलेश भरत जगताप हा दिनांक 31 ऑक्टोबर 2019 पासून डेअरीमध्ये कामास होता. दि. 12 जून 2020 मध्ये संतकृपा डेअरीने निरगुडी, ता. फलटण या ठिकाणी दुध संकलन सुरू केल्याने तेथे निलेश जगताप यांना सुपरवायझर म्हणुन नेमण्यात आले होते. निलेश जगताप हा डेअरीमधून शेतकर्यांना अॅडव्हान्स वाटप करणेसाठी पेमेंट घेऊन जात होता. डिसेंबर 2024 मध्ये निलेश जगताप याने कामावर येणे बंद केल्याने आम्ही त्याची चौकशी केली असता त्यांनी 15 लाख 91000/- रूपये डेअरीतुन शेतकर्यांना अॅडव्हान्स देणे करिता वेळोवेळी व्हौचर करून नेली होती. याबाबत संतकृपा व्यवस्थापनाने खात्री केली असता त्याने शेतकर्यांना रू. 1 लाख 81000/- दिले आहेत. त्याच्याकडून वसुली झालेली आहे. परंतु त्याने रू. 14 लाख दहा हजार रुपये शेतकर्यांना दिलेले नाहीत. याची चौकशी केली असता असे दिसून आले की, त्याने डेअरीमध्ये जमा केलेल्या व्हौचर मधील शेतकर्यांना अॅडव्हान्स रक्कम दिली नाही. शेतकर्यांच्या खोट्या सह्या निलेश जगताप याने करून ती व्हौचर डेअरीमध्ये जमा केली आहेत. तसेच त्याची पत्नी सौ. अपूर्वा निलेश जगताप हिचे कोणत्याही प्रकारचे दुधाचे उत्पादन नसताना 60हजार 690/- रूपये हे डेअरीच्या व्हीचर मधुन अपूर्वा जगताप हिच्या बँक खातेवर घेतले आहेत. त्यावावत त्याला विचारना केली असता आम्हाला तो उडवा उडवीचे उत्तरे देवु लागला. तसेच आमच्या लक्ष्यात आले कि निलेश जगताप याने डेअरीसाठी निरगुडीतील कुलरवर संकलन केलेल्या दुधापैकी सुमारे 1000 वे 1100 लिटर्स दुध हे कोर्हाळे, ता. बारामती येथील मलगंगा मिल्क अॅण्ड अॅग्रो प्रॉ. प्रा. लि. येथे घालत होता. तसेच निरगुडी येथे असलेले दुध तपासणी यंत्र व दुधाची 40 लिटर्सचे 35 कॅन घेवून गेला होता. म्हणून याच्या विरोधात लोणंद पोलिस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दिला होता.
निलेश जगताप याला वांरवार हे प्रकरण मिटविण्याकरिता वोलावले होते. हा डेअरीबाबतीत विषय असून त्यात कोणताही राजकीय हेतू नाही आणि त्याला कोणतेही राजकीय वळण देऊ नये. पोलिसांनी याबाबत चौकशी करून निलेश भरत जगताप याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे.
अशी माहिती