दैनिक स्थैर्य । दि.३० डिसेंबर २०२१ । सातारा । जातीवाचक शिवीगाळ करतच एका महिलेने दुसऱ्या एका महिलेवर चाकूने वार करून तिला जखमी केले. ही घटना मंगळवार, दि. २८ रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयासमोर असणाऱ्या एका बंगल्यात घडली असून याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात शिंदे नावाच्या एका महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, सपना धनराज चव्हाण (वय २५, रा. जुना आरटीओ कार्यालय चौक, सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांना शिंदे नावाच्या महिलेने जातिवाचक शिवीगाळ केली आणि चाकूने वार करत जखमी केले. ‘मी केलेल्या कामाचे पैसेही शिंदे नावाच्या महिलेने पैसे दिले नसून हा प्रकार शिंदे नावाच्या महिलेच्या बंगल्यात घडला,’ असेही तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, या महिलेचे संपूर्ण नाव माहित नसल्याचे सपना चव्हाण यांनी तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस नाईक मोहिते करत आहेत.