विवाहाचे अमिषाने महिलेवर अत्याचार


दैनिक स्थैर्य । दि.०४ मे २०२२ । सातारा । विवाहाच्या आमिषाने एका महिलेवर सातारा शहर परिसरात एकाने अत्याचार केले. तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २७ जानेवारी २०२१ ते दि. २९ जानेवारी २०२१ या दरम्यान मुंबई येथे वास्तव्य करणाऱ्या एका महिलेला विवाहाचे आमिष दाखवून विकास शामराव जाधव वय २८ निसर्ग कॉम्प्लेक्स गावडे पेट्रोल पंपाजवळ, गुणवडी रोड ता. बारामती याने सातारा येथील केबीपी महाविद्यालयाच्या जवळ असणाऱ्या हॉटेलवर, सातारा बसस्थानक जवळ आणि कास पठार जवळ असणाऱ्या एका रिसॉर्टवर अत्याचार केला. त्याच्याकडे विवाह करण्याबाबत विचारले असता त्याने नकार देऊन तुला काय करायच आहे ते कर, अशी धमकी दिल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!