स्थैर्य, खटाव, दि.११ : मायणी (ता. खटाव) येथे एका वेडसर वृद्ध महिलेवर रात्रीच्या वेळी एका अज्ञात तरुणाने बळजबरीने विनयभंग बलात्कार केला. याबाबतची फिर्याद मायणी पोलीस दूर क्षेत्राचे पोलीस कॉन्स्टेबल योगेश सूर्यवंशी यांनी दिली.
बुधवार (दि. ९) रोजी मायणी येथील चांदणी चौकात सकाळपासून एक वेडसर महिला जखमी अवस्थेत झोपलेली होती. तिच्या डोक्यास व तोंडास मार लागला होता .याबाबत ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलिस गेले असता तेथे सुमारे ६० ते ६५ वर्षे वयाच्या माहिलेने रात्री एका जबरदस्ती केली असल्याचे सांगितले . परिसरातील एका दुकानांच्या सीसीटीव्ही फुटेज पाहणी केली असता सदर महिलेवर एक काळसर रंगाचा कोट व निळसर रंगाची पॅन्ट घातलेल्या अंदाजे ३५ ते ४० वर्षे वयोगटातील पुरुषाने तिचे केस ओढून, डोके जमिनीवर आपटून ,हाताने मारहाण करून व तोंड बांधून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचे सीसीटीव्ही फुटेजचे कैद झाले आहे. वडूजच्या पोलीस उपनिरीक्षक पालेकर यांनी मायणी येथे भेट घेऊन सदर महिलेची विचारपूस केली. औषधोपचार करण्यासाठी वडूज येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून सदर आरोपीचा शोध लावण्याचे काम पोलिस विभागातर्फे सुरू आहे.सदर घटनेमुळे मायणीमध्ये खळबळीचे वातावरण पसरले आहे.