सातार्‍यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, 5 जणांवर गुन्हा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. 30 : शहरात राहणार्‍या एका अल्पवयीन मुलीला आंतरजातीय विवाह केल्यावर सरकारकडून तीन लाख रुपये मिळतील असे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करून त्याच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी पाचजणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रिन्स भगत,विजया भगत, आलीशा भगत व दोन प्रिन्स याच्या दोन मावशा (नावे माहित नाहीत) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, संशयित प्रिन्स याने पीडित 17 वर्षाच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्न केल्यास सरकारकडून तीन लाख रुपयांचे अनुदान मिळेल असे आमिष दाखवले. त्यांतर त्याने तिच्यासोबत लग्न करुन तिला दारू पाजून तिच्यावर अत्याचार केले. तसेच तिच्यासोबतचे काही व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. असे कृत्य करण्यासाठी त्याला इतर संशयितांनी मदत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.के. माने हे करत आहेत


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!