ॲथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन केल्यामुळे तालुक्यात ॲथलेटिक्स वाढेल : आमदार दीपक चव्हाण; १२६० खेळाडूंचा सहभाग

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २३ डिसेंबर २०२१ । फलटण । जिल्हा क्रॉसकंट्री स्पर्धा ही फलटण तालुक्यात ॲथलेटिक्स खेळला पुनर्जीवित करण्यासाठी एक संजीवनी ठरणार आहे. या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातून ॲथलेटिक्स प्लेअर तयार होण्यास मदत मिळेल. ॲथलेटिक्सला सर्व खेळांची जननी मानली जाते, ॲथलेटिक्स खेळाडूच्या शारीरिक क्षमतेचा निश्चितच सर्व खेळांना फायदा होतो, अशा या ॲथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन फलटण येथे केल्यामुळे नक्कीच फलटण तालुक्यात ॲथलेटिक्स वाढेल असे प्रतिपादन फलटण कोरेगाव संघाचे आमदार दिपकराव चव्हाण यांनी केले.

सातारा जिल्हा ॲम्युचर ॲथलेटिक्स असोसिएशन व फलटण तालुका ॲथलेटिक्स असोसिएशन आणि फलटण जिमखाना, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रॉसकंट्री निवड स्पर्धा २०२१- २२ चे आयोजन दि.१९ डिसेंबर २०२१ रोजी फलटण येथे करण्यात आले होते. या स्पर्धेचा शुभारंभ पंचायत समितीचे सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला तर बक्षीस वितरण समारंभ आमदार दिपकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार दीपकराव चव्हाण बोलत होते. याप्रसंगी फलटण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. नीता मिलिंद नेवसे जाधवाडीच्या सरपंच सीमा आबाजी गायकवाड, माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, प्राचार्य गंगावणे सर, भाऊसाहेब कापसे, अनिल शिरतोडे, पत्रकार सुभाष भांबुरे, किरण बोळे, सुधीर अहिवळे, फलटण तालुका क्रीडा अधिकारी महेश खुटाळे,जिल्हा ॲम्युचर ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव उत्तमराव माने, सहसचिव संजय वाटेगावकर उपस्थित होते.

ॲथलेटिक्समुळे खेळाडूची शारीरिक क्षमता व सुदृढता वाढते आणि यामुळे खेळाडूच्या कौशल्या बरोबरच त्याची खेळातील कामगिरीही उंचावते, त्यामुळे अशा स्पर्धा फलटण तालुका ॲथलेटिक्स असोसिएशन व फलटण जिमखाना यांनी वारंवार आयोजित कराव्यात, त्या स्पर्धांना आमचे संपूर्ण सहकार्य राहील अशी ग्वाही देतानाच आमदार दीपक चव्हाण यांनी फलटण तालुका ॲथलेटिक्स असोसिएशन व फलटण जिमखाना तसेच जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनने आयोजित केलेल्या जिल्हा क्रॉस कंट्री स्पर्धेचे कौतुक करून आयोजकांचे अभिनंदन केले.

जिल्हा क्रॉसकंट्री स्पर्धेत फलटण पंचायत समितीचे सभापती विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी १० किलोमीटर स्पर्धेत सहभागी होत सर्व खेळाडूंना प्रेरणा दिली. फलटण येथील ६८ वर्षीय ज्येष्ठ महिला सईदा नजमुद्दीन पटेल यांनी १० किलोमीटरची स्पर्धेत सहभागी होत ओपन महिला स्पर्धेत ६ वा क्रमांक मिळवत खेळाडूंमध्ये एक आदर्श निर्माण केला. आयर्न मॅन अमित डिसले व डॉ. मयूर फरांदे यांच्यासह ६ वर्षीय स्वरा भागवत व ६ वर्षीय राजवीर कचरे यांनी क्रॉस कंट्री स्पर्धेत सहभाग होऊन स्पर्धकांचा उत्साह वाढवला.

जिल्हा क्रॉसकंट्री निवड स्पर्धेस सातारा जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत १२६० खेळाडूंनी सहभाग नोंदवला. या स्पर्धा मुली व मुलांच्या १४, १६, १८, २० व ओपन वयोगटांमध्ये खेळविण्यात आल्या, विजयी खेळाडूंची निवड २६ डिसेंबर रोजी सांगली येथे होणाऱ्या राज्य क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी करण्यात आली आहे.

जिल्हा क्रॉसकंट्री स्पर्धा यशस्वी करण्यासाठी फलटण तालुका ॲथलेटिक्स असोसिएशनचे नामदेव मोरे सर, तायप्पा शेंडगे सर, अ‍ॅड.रोहित अहिवळे, सचिन धुमाळ सर, तुषार मोहिते, राज जाधव, जनार्दन पवार, सुहास कदम, शरद जाधव, पंकज पवार, अविनाश गंगतिरे उर्फ मुन्ना, दिलीप जाधव, अविनाश सुळ, विविध शाळांचे क्रीडा शिक्षक, खेळाडू यांनी परिश्रम घेतले. तर सातारा जिल्हा ॲम्युचर ॲथलेटिक्स असोसिएशनचे खजिनदार चिंचकर सर, सहसचिव राजगुरू कोचळे सर , मनोहर यादव, अंतरराष्ट्रीय खेळाडू कैलास माने, अतुल पाटील, महेंद्र भोसले, सोमनाथ शिंदे यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी टेक्निकल सहकार्य केले.

जिल्हा क्रॉसकंट्री स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे आहे. 14 वर्षाखालील मुली – प्रथम क्रमांक आर्या आजिनाथ काळेले (मानदेशी) द्वितीय क्रमांक श्रावणी नरेंद्र लिबे (कराड) तृतीय क्रमांक आकांक्षा संजयकुमार देवकर (मार्डी). 14 वर्षा खालील मुले – प्रथम क्रमांक अथर्व शंकर ताटे (हिरकणी कराड) द्वितीय क्रमांक यश सुरेश चव्हाण (मार्डी), तृतीय क्रमांक सोहम उदय साळुंखे (कराड)

16 वर्षाखालील मुली – प्रथम क्रमांक अंकिता संजय सावंत (मानदेशी) द्वितीय क्रमांक अंजली आजिनाथ काळेल (मानदेशी) तृतीय क्रमांक स्नेहल विठ्ठल काळेल (मानदेशी). 16 वर्षाखालील मुले – प्रथम क्रमांक मोहित संतोष जगताप (निगडी) रविराज सचिन धोत्रे (गुरुकुल सातारा) उमेश गोपीनाथ आजमाने (वहागाव)

18 वर्षाखालील मुली – प्रथम क्रमांक प्राची अंकुश देवकर (हिरकणी कराड) द्वितीय क्रमांक सानिका अभिजीत नलवडे (महेंद्र स्पोर्ट्स) तृतीय क्रमांक शिवानी नवनाथ शेळके (डी पी भोसले कोरेगाव). 18 वर्षाखालील मुले – प्रथम क्रमांक वैभव सुभाष पांढरे (डीपी भोसले कोरेगाव) द्वितीय क्रमांक प्रथमेश विजय साळुंखे (मानदेशी) जीवन वसंत जाधव (कराड)

20 वर्षाखालील मुली – प्रथम क्रमांक विशाखा संजय साळुंखे (मांढरदेव) द्वितीय क्रमांक रोशनी राजेंद्र पाटणकर (कराड) तृतीय क्रमांक गौरी किसन खिलारे (डीपी भोसले कोरेगाव). 20 वर्षाखालील मुले – प्रथम क्रमांक दादा प्रकाश शिंगाडे (मानदेशी) द्वितीय क्रमांक सुरज लक्ष्मण खोटरे (वाई) तृतीय क्रमांक निशांत विलासराव सावंत (मानदेशी)

महिला गट – प्रथम क्रमांक रेश्मा दत्तू केवटे (मानदेशी) द्वितीय क्रमांक आकांक्षा प्रकाश शेलार (मांढरदेव) तृतीय क्रमांक निकिता दशरथ भोसले (डी पी भोसले कोरेगाव). पुरुष गट – प्रथम क्रमांक सुशांत मनोहर जेधे (मांढरदेव) द्वितीय क्रमांक बाळू पोपट पुकळे (मांढरदेव) तृतीय क्रमांक प्रतिक शिवाजी उंबरकर (मांढरदेव).


Back to top button
Don`t copy text!