खेळाडूंनी लक्ष्य निश्चित करून यश मिळवा : शर्मिला पवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १२ ऑक्टोबर २०२२ । बारामती ।  राज्य, देश, आंतरराष्ट्रीय, ऑलिम्पिक आदी स्पर्धेचे लक्ष्य निश्चित करा व त्याप्रमाणे यश मिळवण्यासाठी प्रत्यनशील राहावे असे प्रतिपादन शरयु फौंडेशनच्या अध्यक्षा सौ शर्मिला पवार यांनी केले.

जिल्हा क्रीडा संकुल येथे बारामती कराटे असोसिएशन व शरयु फौंडेशन यांच्या वतीने तिसरी महाराष्ट्र चॅम्पियन कराटे स्पर्धा संपन्न झाली.
या लीग स्पर्धेचे बक्षिस वितरण प्रसंगी शर्मिला पवार बोलत होत्या यावेळी क्रीडा अधिकारी महेश चावले, इंदापूर युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शुभम निबांळकर,शरयु फौंडेशनचे सदस्य ऍड.रोहित काटे,विक्रम निंबाळकर, सुरज काटे,वैभव वाघमोडे, गौरव जाधव व बारामती कराटे असोसिएशनचे प्रमुख प्रशिक्षक रविंद्र करळे,अभिमन्यू इंगुले,मुकेश कांबळे, शिवाजी भिसे, राहुल सोनवणे,सुमेध कांबळे, हर्षद सागडे , श्रावणी तावरे, आयेशा शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

खेळाडूंनी जिद्द चिकाटी आत्मविश्वास या जोरावर यश संपादन करावे व ऑलम्पिक,राष्ट्रकुल स्पर्धेसाठी प्रयत्न करा व देशाचे नाव उज्वल करा असेही सौ शर्मिला पवार यांनी सांगितले.

ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना या स्पर्धेच्या माध्यमातून यश मिळवता यावे व त्यांच्या मधील गुणवत्ता, खिलाडी वृत्ती विकसित होणेसाठी मदत होईल म्हणून स्पर्धेतील उत्कृष्ट २५ खेळाडूंना २१गिअर असलेल्या २५ सायकलचे वाटप तसेच १८ वर्षावरील पुरुष व महिला गट यामध्ये प्रति गट २५०००/- असे रुपये एकूण २०००००/-लाखाचे रोख पारितोषिकाचे वाटप विजेत्यांना सौ.शर्मिला पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच संघाघिक विजेत्या संघाना ही काता व कुमिते प्रकारामध्ये ५ व्या क्रमांकापर्यंत ट्रॉफीज देण्यात आल्या
काता प्रकार
१)संतोष मोहिते टिम (सातारा)
२)रविंद्र करळे टिम (बारामती,पुणे ग्रामीण)
३)गिरीश कोळी (कोल्हापूर )
४)प्रसाद सावंत टिम (रायगड )
५) जामील खान (पुणे सिटी )
कुमिते
१)प्रीतम इचके टिम (पिंपरी चिंचवड )
२)राजन शिंदे टिम (भेकराई नगर,पुणे )
३)शरद फंड टिम (पुणे ग्रामीण)
४)विवेक भूषनम (पुणे सिटी )
५)ज्ञानसागर इंग्लिश मीडियम स्कूल टिम (सावळ बारामती)

सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले. आभार अभिमन्यू इंगुले यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!