दैनिक स्थैर्य । दि. १९ मे २०२२ । मुंबई । अथेना एज्युकेशन या माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण सल्लागार आणि लाइफ कोचिंग कंपनीने विद्यार्थ्यांना भविष्यात उपयोगी पडणारी जीवन कौशल्ये शिकवण्यासाठी मुंबईत “बिल्डिंग युअर ह्युमन ब्रॅण्ड”या विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती. शाळेत जाणा-या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक व अभ्यासेत्तर प्रकल्प आणि ते तयार करण्याच्या दिशेने उपक्रम निवडताना, तसेच त्यांचे नियोजन करताना त्यांच्या ब्रॅण्डचा विचार कसा आणि का केला पाहिजे यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. अथेनाच्या शैक्षणिक सेवांचे अद्वितीय तत्त्व समजून घेण्यासाठी मुंबईभरातील पालक या कार्यशाळेला उपस्थित होते.
अथेना एज्युकेशन विद्यार्थ्यांना वेळ व्यवस्थापन तंत्र, स्प्रेडशीट विश्लेषण, डेटा विश्लेषण, सर्जनशील लेखन यांसारखी शालेय विषयांपेक्षा वेगळी जीवन कौशल्ये शिकवते. अथेनाने इयत्ता ६वी ते ९वीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या ज्युनिअर प्रोग्रामचे स्वरूप स्पष्ट केले. प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये ३६०-अंश सर्वांगीण विकास, वितरण करण्यायोग्य-केंद्रित कॅपस्टोन प्रकल्प नियोजन व अंमलबजावणी आणि पालकांसाठी अभ्यासासंदर्भातील प्रगतीवर देखरेख यांचा समावेश आहे. अथेनाने त्यांच्या यशाचा आराखडा देखील दाखवला – त्यांच्या १५ टक्के हुशार विद्यार्थ्यांना आयव्ही लीग्समध्ये प्रवेश मिळाला, तर २०२२ बॅचमधील त्यांच्या ९७ टक्के विद्यार्थ्यांना त्यांच्या लक्ष्य युनिव्हर्सिटीजमध्ये यशस्वीरित्या प्रवेश मिळाला.