वडजल येथे कृषीकन्यांनी दिले ‘मार्मालेड’ बनविण्याचे प्रशिक्षण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ६ जुलै २०२४ | फलटण |
वडजल, ता. फलटण येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचे संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी संचालित कृषी महाविद्यालय, फलटणमधील चतुर्थ वर्षातील विद्यार्थिनींनी ग्रामीण जागरुकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२५ अंतर्गत ‘मार्मालेड’ बनविण्याचे प्रशिक्षण गावातील स्त्रियांना दिले.

संत्रीपासून विविध पदार्थ बनविले जातात. त्यातील एक म्हणजे ‘मार्मालेड’. ‘मार्मालेड’पासून होणारे फायदे व इतर पदार्थांपेक्षा ‘मार्मालेड’ जास्त काळ टिकून राहते. ‘मार्मालेड’ हा एकमेव असा पदार्थ आहे, ज्यामध्ये सालीचा देखील उपयोग होतो.

प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महिलांनी त्याबद्दल चांगला प्रतिसादही दिला. यावेळी गावातील स्त्रिया व कृषीकन्या धनश्री जगताप, सुप्रिया खिलारे, शुभांगी गावडे, गायकवाड श्रेया, जगताप, प्राजक्ता, ऐश्वर्या गिरमे, धुमाळ सई, ज्ञानेश्वरी जाधव यांनी हा कार्यक्रम राबविला. .

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे व प्रा. नितीशा पंडित, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे यांचे विद्यार्थिनींना मार्गदर्शन लाभले.


Back to top button
Don`t copy text!