वाठार स्टेशनचे जवान विशाल पवार अनंतात विलीन


दैनिक स्थैर्य | दि. ११ नोव्हेंबर २०२१ | सातारा | वाठार स्टेशन येथील जवान विशाल विश्वासराव पवार वय (३२) यांचे पुणे येथील कमांड हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना निधन झाले. ते जम्मू काश्मिर येथील पूंछ (राजौरी) या ठिकाणी १६ मराठा लाईट इनफंट्री येथे हवालदार म्हणून देश सेवा बजावत होते. एक वर्षा पूर्वी त्यांना सेवा बजावत असताना श्र्वसनाचा त्रास जाणऊ लागल्याने त्यांना उदमपूर येथे प्राथमिक उपचाराकरिता दाखल करण्यात आले त्यानंतर त्यांना दिल्ली येथील आर्मी हॉस्पिटलला हलविण्यात आले नंतर तीन महिन्यापासून त्यांना पुणे येथील कमांड हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते.काल दुपारी ४:३० वाजता त्यांचे उपचारा दरम्यान निधन झाले.

१४ वर्षापासून ते भारतीय सैन्य दलात कार्यरत होते त्यांनी आसाम, ग्वालियर, जम्मू काश्मीर (राजुरी) या ठिकाणी देशसेवा केली त्यांच्या पश्‍चात पत्नी आई-वडील व भाऊ, विवाहित बहीण,८ वर्षाचा वरद व ५ वर्षाचा वेदांत अशी दोन मुले असा परिवार आहे. गावाकडे सुट्टीवर असताना ते मनमिळावू स्वभावामुळे ग्रामस्थांच्या परिचित होते त्यांचे मूळ गाव गुजरवाडी हे आहे व्यवसायानिमित्त त्यांचे कुटुंबीय वाठार स्टेशन येथे वास्तव्यास आहेत त्यांच्या वडिलांनी सातारा पोलीस दलात कार्य केले होते. निधनाची बातमी कळताच वाठार स्टेशन पंचक्रोशी वर दुखःचे सावट पसरले. आज सकाळ पासून वाठार येथील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ संपूर्णपणे बंद ठेवून श्रद्धांजली वाहिली दुपारी शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात त्यांच्यावर दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले तत्पूर्वी शहीद जवान विशाल पवार यांच्या पार्थिवाची फुलांनी सजवलेल्या ट्रॉली तुन अंतयात्रा काढण्यात आली यावेळी ग्रामस्थांनी दुतर्फा उभे राहून फुलांची आदरांजली वाहिली सातारा पोलीस दलाच्या तसेच सैन्य दलातील अधिकाऱ्यांच्या वतीने त्यांना २१ बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देण्यात आली.यावेळी आमदार दिपक चव्हाण,आमदार महेश शिंदे,तहसीलदार अमोल कदम,गटविकास अधिकारी क्रांती बोराटे, सातारा सैनिक कल्याण बोर्डाचे अधिकारी, १६ मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान,जि,प,सदस्य अभय तावरे, माजी उपसभापती रुपाली जाधव, माजी जि,प,सदस्य राहुल कदम,सरपंच निता माने, तसेच वाठार पंचक्रोशीतील हजारोच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.


Back to top button
Don`t copy text!