स्थैर्य, पांचगणी, दि. १२ : संपूर्ण महाराष्ट्र राज्याला नव्हे तर भारत देशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पराक्रमाची गाथा सांगणारा गड म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या प्रतापगडच्या पायथ्याशी तटाचे दगड कोसळल्याचे दिसून येत आहे.
सध्या टाळेबंदी मुळे राज्यातील गड किल्ले आणि सर्व पर्यटन स्थळ बंद असल्यामुळे सध्या गडाकडे कोणी फिरकत नसल्यामुळे पावसाळ्याचे दिवस असल्याने या गड-किल्ल्यांवर झालेल्या पडझडीच्या घटना ही कळत नाहीत.
प्रतापगड च्या पायथ्याशी ही दगडी चिरेबंदी कोसळल्याचे दिसून येत आहे .सध्या महाबळेश्वर प्रतापगड परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने गडाच्या मुख्य बुरुजाच्या खालच्या बाजूस असलेली जमीन व काही बांधव दगड असल्याचे दिसून येत आहे .काही इतिहासप्रेमींनी याबाबत प्रशासनाला जाग आणून दिली आहे. तसेच विद्यमान राज्य सरकारने आणि संबंधित विभागाने या किल्ल्याकडे लक्ष देऊन तातडीने काळजी घ्यावी अशी मागणी केली आहे.