
दैनिक स्थैर्य | दि. ६ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
कृषी महाविद्यालय फलटण येथील अंतिम वर्षातील विद्यार्थिनींनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२४ कार्यक्रमांतर्गत सांगवी येथील शेतकर्यांना वाढत्या रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी व त्यामुळे होणारी पिकांची हानी रोखण्यासाठी बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी सांगवी गावातील १८ शेतकरी उपस्थित होते.
रब्बी हंगामामध्ये ज्वारी या पिकावरती पेरणीनंतर तीन आठवड्यांपासून सव्वामहिने या कालावधीत काणी रोग प्रादुर्भाव दिसून येतो. काणी हा रोग प्रामुख्याने रब्बी हंगामात येतो काणीचे दोन प्रकार पडतात.
१) दाणे काणी : हा रोग स्पोरीस्पोरीयम सोरघी या बुरशीमुळे होतो. ह्यात ज्वारीच्या कणसात दाणे भरण्याऐवजी तेथे काणीयुक्त दाणे तयार होतात.
२) मोकळी काणी : हा रोग स्पोरीस्पोरीयम क्रूएन्टम या बुरशीमुळे होतो. यात संसर्गित ताटामध्ये लवकरच फुलोरावस्था येवून त्यात अनेक फुटवे येतात.
कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण सर, उद्यानविद्या महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे मॅडम तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित मॅडम व विषयतज्ञ प्रा. भोसले सर यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली कृषीकन्या कु. अनुजा भिसे, प्रणिता आगवणे, ऋतुजा भामे, अंकिता कुंभारकर, तनुजा शिंगाडे, पूजा चौधर यांनी हे प्रात्यक्षिक करून दाखविले.