दैनिक स्थैर्य | दि. ३ डिसेंबर २०२४ | फलटण |
फलटण तालुक्यातील रावडी बु. येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी सलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषिदूतांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत पिकांवरील वाढत्या रोगांचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी तसेच पिकांना लवकरात लवकर परिपक्वता येण्यासाठी विविध प्रकारच्या बीजप्रक्रिया केल्या.
यावेळी हरभरा या पिकावरील बुरशीजन्य रोग नियंत्रण करण्यासाठी थायरम ७५% डब्ल्यूएस, ५ ग्रॅ./कि.ग्रॅ. हे वापरण्यात आले. थायरम हे ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक आहे आणि त्यात स्पर्शिनाशक बुरशीनाशक आहे. या कार्यक्रमात बीजप्रक्रियेचे विविध फायदे शेतकर्यांना पटवून देण्यात आले.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे सर, कार्यक्रम अधिकारी नीतिषा पंडित, पीक रोगतज्ज्ञ प्रा. पी. व्ही. भोसले सर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत जगताप प्रजोत, कदम रोहन, गौंड अनिकेत, गरगडे प्रणव, गोलांडे तुषार, गुरव ओंकार, सार्थक शेंडगे यांनी हा उपक्रम पार पडला.