
दैनिक स्थैर्य | दि. २७ डिसेंबर २०२४ | फलटण |
फलटण तालुक्यातील रावडी बु. येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न, फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित, कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीदूतांनी ग्रामीण जागरुकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२५ कार्यक्रमांतर्गत कृषिदूतांनी संत सावतामाळी मंदिर, रावडी बु. येथे रांगोळीच्या माध्यमातून ग्रामीण जीवनाचे दर्शन घडवले. या उपक्रमास ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या रांगोळीतून कृषिदूतांनी गावातील शेती, ग्रामपंचायत, रस्ते, निरा नदी, निरा उजवा कालवा, देऊळ प्राथमिक आरोग्य केंद्र, माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषद शाळा, कृषी दुकाने, दूध संकलन केंद्र, किराणा दुकान अशा अनेक गोष्टी दाखविल्या.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित मॅडम, समन्वयक प्रा. निलिमा धालपे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत जगताप प्रजोत, कदम रोहन, गौंड अनिकेत, गरगडे प्रणव, गोलांडे तुषार, गुरव ओंकार, सार्थक शेंडगे यांनी हा कार्यक्रम पार पडला.