
दैनिक स्थैर्य | दि. १२ ऑगस्ट २०२३ | फलटण |
श्री तीर्थक्षेत्र सुवर्णनगरी पुसेगाव, ता. खटाव येथे पुरूषोत्तम अधिक मासानिमित्त भव्य दिव्य महोत्सव सोहळा शनिवार, १२ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२३ दरम्यान आयोजित केला आहे.
परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या कृपाशिर्वादाने परमपूज्य मठाधिपती १०८ श्री महंत सुंदरगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाने पुरूषोत्तम (अधिक ) मास पर्वकाळ निमित्त श्री सेवागिरी महाराजांच्या मंदिरामध्ये श्री सिद्धेश्वर देवतेस महारूद्र स्वाहांकार अनुष्ठान दि. १२/०८/२०२३ ते १४/०८/२०२३ (एकादशी ते त्रयोदशी शिवरात्री) या कालावधीत होणार आहे. दि. १२ ऑगस्ट शनिवारी पुण्याह वाचन, महापूजा, रूद्र आवर्तने तसेच सायंकाळी ७ ते ९ वाजता महाराष्ट्रातील नामवंत भारूडकार ह.भ.प. श्री सावता महाराज फुले संणसर यांचा उत्कृष्ट असा भारूडाचा कार्यक्रम तसेच जय हनुमान भजन सेवा मंडळ पुसेगाव यांची अखंड एकादशी भजन सेवा होईल.
दि. १३ ऑगस्ट रविवार रोजी महापूजा, रूद्र आवर्तने, सायंकाळी ९ ते ७ वाजता हभप श्री काका महाराज पहाणे (तीर्थक्षेत्र आळंदी) यांचे कीर्तन, सोमवार दि. १४ ऑगस्ट रोजी पुण्याह वाचन, अग्नी स्थापन, देवतास्थापन, स्वाहाकार, बलिदान पूर्णाहुती, महानैवेद्य, आरती तसेच सायंकाळी ९ ते ७ वाजता हभप श्री केशव महाराज मुळीक, बारामती यांचे कीर्तन तसेच मंगळवार, दि. १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ ते ९ वाजता हभप श्री स्वानंद महाराज अडसूळ (श्री ज्ञानाई गुरूकुल अकलूज) यांचे कीर्तन होणार आहे.
बुधवार, दि. १६ ऑगस्ट रोजी दुपारी परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराज यांची महाआरती व उपस्थित भाविकभक्तांना महाप्रसादाचे वाटप होणार आहे. समस्त वारकरी भक्तगणांनी या ज्ञानदान सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.