पिंपरद येथे कृषीकन्यांनी शेतकर्‍यांना चारा उपचाराचे दिले प्रात्यक्षिक


दैनिक स्थैर्य | दि. २७ सप्टेंबर २०२३ | फलटण |
कृषी महाविद्यालय फलटण येथील अंतिम वर्षातील विद्यार्थिनींनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२४ कार्यक्रमांतर्गत पिंपरद येथील शेतकर्‍यांना चारा उपचाराचे प्रात्यक्षिक दिले.

निकृष्ट चार्‍याचे रूपांतर सकस चार्‍यामध्ये तसेच चार्‍याचा पोषणमूल्यांच्या पूर्ण उपयोग करण्याकरता चार्‍यावर युरिया, मीठ याचे मिश्रण करून चार्‍यावर प्रक्रिया केल्यास निकृष्ट चार्‍याची पौष्टिकता वाढते, चार्‍याची चव पाचकता व त्यातील नत्राचे प्रमाण वाढते. त्यामुळे जनावरे चारा आवडीने खातात. उन्हाळ्यामध्ये प्रामुख्याने पाण्याच्या कमतरतेमुळे चारा घेणे अशक्य होते, त्यावेळेस जनावरांना पिकांचा वाळलेला चारा म्हणून उपयोग होतो; परंतु अशा चार्‍याची गुणवत्ता बाजारपेठेत चांगली असेलच याची खात्री नसते. म्हणून प्रत्येक शेतकर्‍यांनी त्यांच्या गुरांच्या चार्‍यावरती चारा प्रक्रिया केली तर हे नक्की त्यांना फायद्याचे ठरेल. चारा प्रक्रिया केल्यामुळे चारा वाया जाणार नाही, पशूंना योग्य प्रकारात पोषक आहार भेटेन व पशूचे आरोग्य चांगले राहील, असे महत्त्व कृषीकन्यांनी शेतकर्‍यांना समजावून सांगितले. यावेळी आठ शेतकरी उपस्थित होते.

कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण सर व कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे मॅडम तसेच कार्यक्रम अधिकारी नितिशा पंडित मॅडम आणि पशूसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग प्रा. स्वप्नील लाळगे सर यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली कृषीकन्या कु. निशिगंधा खुडे, समृद्धी जगताप, आरती जाधव, अक्षदा जाधव, प्रणिता गोडसे, आर्या जाधव, प्रतीक्षा जगताप यांनी हे प्रात्यक्षिक यशस्वीरित्या पार पाडले.


Back to top button
Don`t copy text!