दैनिक स्थैर्य । दि. ०३ जुलै २०२२ । फलटण । सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांना फलटण येथे वारीमध्ये अचानक भोवळ आल्याने बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांची एकच धावपळ उडाली त्यांना सहकाऱ्यांनी खुर्ची बसायला देऊन पाणी दिल्याने बंसल हे काही काळातच स्वस्थ झाले . मात्र या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
फलटण येथे आज शनिवारी दुपारी वारीच्या बंदोबस्तासाठी स्वतः पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल हे स्वतः जातीने उपस्थित होते. त्यावेळी त्यांना अचानक भोवळ आल्याने ते खाली बसले. त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या अंगरक्षकाने तातडीने त्यांना बसायला खुर्ची देऊन पाणी दिले. अधीक्षक बन्सल यांना भोवळ आल्याचे समजतात सोलापूर च्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते याही तेथे हजर झाल्या. त्यांनी बन्सल यांची चौकशी केली. थोडा वेळ खुर्चीवर बसल्यानंतर बन्सल यांना बरे वाटू लागले. अनेकांनी त्यांना तुम्ही विश्रांती घ्या असा सल्ला दिला, मात्र आजचा दिवस मी इथून जाणार नाही, अशी भूमिका बन्सल यांनी घेतली. त्यांना बरे वाटू लागल्यानंतर ते पुन्हा बंदोबस्तामध्ये सहभागी झाले होते.