स्थैर्य, सातारा, दि. १४: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कराड येथील त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, कराड नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते सौरभ पाटील, माजी नगरसेवक गंगाधर जाधव, जयंत बेडेकर, तहसीलदार अमरदीप वाकडे, कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, किशोर आठवले, कैलास थोरवडे, राकेश थोरवडे, अमोल सोनवले, प्रवीण लादे, अशोक पाटील हे उपस्थित होते.