दैनिक स्थैर्य | दि. ०९ नोव्हेंबर २०२१ | फलटण | राज्यामध्ये बहुचर्चित ठरलेला आसुडगाठ हा मराठी चित्रपट एम. एक्स. प्लेयरद्वारे प्रकाशित करण्यात आलेला आहे. तरी प्रेक्षकांनी एम. एक्स. प्लेयरद्वारे आसुडगाठ हा चित्रपट पाहावा, असे आवाहन विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
फलटण येथील विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी आसुडगाठ चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी श्रीमंत रामराजे बोलत होते. यावेळी फलटणचे आमदार दीपक चव्हाण, पंचायत समिती सदस्य सौ. रेश्मा भोसले, माजी सभापती शंकर (अप्पा) माडकर, आसुडगाठ चित्रपटाचे दिग्दर्शक सुधीर पवार, कॅमेरामन योगेश गंगतीरे, कार्यकारी निर्माते व चित्रपट महामंडळाच्या भरारी पथकाचे सदस्य बापू बंगाळे, सुधीर नाचण, तुषार झगडे यांच्यासह आसुडगाठ चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.