केंद्रीय गृहमंत्री ना. अमित शहांच्या त्या व्यक्तव्याच्या निषेधार्त आसू बंद


दैनिक स्थैर्य | दि. २२ डिसेंबर २०२४ | फलटण | सिद्धार्थ तरुण मंडळ व दलित पँथर यांच्यावतीने आसू येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री ना. अमित शहा यांच्या निषेधार्त व परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाल्याने, बीड मधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आसू येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.

प्रारंभी मोर्चेकऱ्यांनी आसू येथील बौद्ध विहार येथून गावातून रॅली काढण्यात आली. जोरदार घोषणाबाजी करत प्रमुख मार्गावरून ही रॅली काढण्यात आली.
यावेळी सिद्धार्थ तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बरड पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला. यावेळी बरड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव जायपत्रे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

आसूचे पोलीस पाटील अशोक गोडसे यांनी ही सहकार्य केले; बाजारपेठेत ही कडकडीत बंद पाळण्यात आला होता.


Back to top button
Don`t copy text!