
दैनिक स्थैर्य | दि. 01 ऑगस्ट 2023 | फलटण | फलटण ग्रामीण पोलिस ठाणे येथे सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक हुलगे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आपल्या नव्या नियुक्तीच्या ठिकाणी पदभार स्वीकारला आहे.
अशोक हुलगे हे मूळचे कोर्टी, ता. करमाळा, जि. सोलापूर येथील रहिवासी असून पोलिस खात्यात त्यांनी सुमारे १३ वर्षे पोलिस उप निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक या पदावर आतापर्यंत मुंबई, यवतमाळ, धाराशीव या पोलिस ठाण्यात उत्तम काम केले आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात पदभार स्वीकारल्यानंतर येथील ओरियन नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात संस्थेचे चेअरमन हणमंतराव तथा आण्णा सरक यांनी त्यांचे यथोचित स्वागत व सत्कार केला, यावेळी पतसंस्थेचे संचालक, सभासद, अधिकारी उपस्थित होते.