अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत स‍हा पिडीतांच्या अवलंबितांना शासकीय वसतिगृहांमध्ये नोकरी – सहायक आयुक्त नितीन उबाळे


दैनिक स्थैर्य । दि.०८ मार्च २०२२ । सातारा । अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 सुधारित नियम 2015 अनव्ये खुन प्रकरणातील अनुसूचित जातीच्या व अनुसूचित जमातीच्या मृत व्यक्तींच्या स‍हा पिडीतांच्या अवलंबितांना सहायक आयुक्त, समाज कल्याण सातारा यांच्या अधिनस्त असलेल्या शासकीय वसतिगृहांमध्ये नोकरी देण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त समाज कल्याण नितीन उबाळे यांनी दिली.

नुकत्याच झालेल्या जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीमध्ये अध्यक्ष जिल्हा दक्षता नियंत्रण समिती तथा जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी याबाबतचे आदेश दिले होते.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील खुन प्रकरणातील अनुसूचित जातीच्या व अनुसूचित जमातीच्या मृत व्यक्तींच्या कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरी देण्याची तरतूद करण्यत आलेली आहे. यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे, आयुक्त समाज कल्याण प्रशांत नारनवरे, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण, पुणे विभाग पुणे बाळासाहेब सोळंकी यांचे मार्गदर्शन लाभले असेही श्री. उबाळे यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!