उपायुक्त तुषार मोहिते यांच्याकडून सामाजिक बांधिलकी जपत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर अन्नछत्र मंडळास मदत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. ५ : फलटण शहरातील मंगळवार पेठेतील गरजूंच्या जेवणाची सोय करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर अन्नछत्र मंडळास आयकर विभाग, पुणेचे उपायुक्त तुषार मोहिते यांनी मदत करुन सामाजिक बांधिलकी जोपासली. तुषार मोहिते यांनी कोरोना विरुद्धच्या लढ्यात आपली सामाजिक बांधिलकी जपत सुरवडी व आसपासच्या गावात अनेक सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून गरजूंना मोठ्या प्रमाणावर मदत सुरु ठेवली आहे. याच मदत कार्यातील एक भाग म्हणून तुषार मोहिते यांच्यावतीने अन्नदानाची मदत करण्यात आली. या अन्नदानाचा शुभारंभ फलटण नगरपरिषदेच्या नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर व नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाला. 

दरम्यान, नगरसेवक सनी अहिवळे यांच्या मार्फत मंगळवार पेठ येथे सुरु असलेल्या अन्नछत्राचा लाभ दररोज 500 ते 600 गरजू लोक घेत आहेत. अडचणीच्या काळात सनी अहिवळे यांनी अव्याहतपणे सुरु ठेवलेल्या या मदत कार्याबद्दल नागरिकांमधून त्यांचे कौतुक होत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!