स्थैर्य, मेढा, दि.२४: जावळी तालुक्यातील मिनी पाचगणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रुईघर गणेश पेठ येथील जागे मधील अतिक्रमणाचा पंचनामा करण्याच्या कारणावरून आनंदा महादेव सपकाळ, महिंद्र आनंदा सपकाळ ,यांनी सचिन शिवराम कांबळे, वय 40 व इतर यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी मेढा पोलीस स्थानकामध्ये आनंदा महादेव सपकाळ ,महेंद्र आनंद सपकाळ ,कामिनी महेंद्रा सपकाळ, हौसाबाई आनंदा सपकाळ, सर्व राहणार रुइघर, तालुका जावळी असे चार जणांच्या विरोधात मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर याच प्रकरणात जमीन मोजणी करून दिल्याचा मनात राग धरून सचिन शिवाजी कांबळे, व विशाल भिमराव कांबळे यांनी देखील लाकडी दांडक्याने महेंद्र आनंदा सपकाळ व त्यांच्या सहज चार जणांना लाकडी दांडक्याने मारहाण केली असल्याने सचिन शिवाजी कांबळे, विशाल भिमराव कांबळे ,प्रवीण शिवाजी कांबळे ,शकुंतला शिवाजी कांबळे, नंदा प्रवीण कांबळे ,पूजा प्रशांत कांबळे, शैला सचिन कांबळे, शिवाजी तुकाराम कांबळे, सर्व राहणार रुईघर तालुका जावळी असे परस्पर विरोधात एकूण बारा जणांच्या विरोधात लाकडी दांड्याने एकमेकांना मारहाण करणे व जखमी करणे या प्रकरणी मेढा पोलिस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रुईगघर तालुका जावळी येथील गट नंबर 486 मध्ये अतिक्रमणाचा पंचनामा करण्याच्या कारणावरून व दुसऱ्या गटाच्या फिर्यादीनुसार जमिनीमध्ये मोजणी करून दिल्याचा मनात राग धरून असे दोन परस्पर विरोधी गुन्हा दाखल असून या दोन्ही कारणा मुळे दोन्ही गटातील एकूण बारा जणांनी एकमेकाच्या विरोधात शिवीगाळ व बाचाबाची करत परस्परांच्या विरोधात दांडक्याने मारहाण केली यामध्ये मध्ये दोन्ही गटातील स्त्री व पुरुष मारहाणीत जखमी झाले दोन्ही गटातील असे एकूण बारा सरांच्या विरोधामध्ये दांडक्याने मारहाण व परस्परांना शिवीगाळ करणे व सार्वजनिक शांतता भंग करणे अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास मेढा पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने करत आहेत.