स्थैर्य, सातारा, दि.१८: येथील जिल्हा परिषद येथे जुन्या भांडणातून एकास शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली. साहिल इनामदार आणि उमर बागवान अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. जिल्हा परिषद मैदानासमोरील फुटपाथवर दोघा संशयीतांनी प्रतिक मानसिंग केसरकर रा. माळ्याचीवाडी, ता. सातारा यांना जुन्या भांडणातून शिविगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पो. उ. नि. कदम तपास करत आहेत.