खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून सुरवडी रेल्वे क्रॉसिंग शेजारील रस्त्याचे डांबरीकरणाची सुरवात : सरपंच जितेंद्र साळुंखे – पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २२ डिसेंबर २०२१ । फलटण । सुरवडी येथील रेल्वे क्रॉसिंगच्या शेजारील 700 मीटर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले. सदरील रस्ता हा अतिशय खराब झाल्यामुळे सुरवडी गावातील व पंचक्रोशीतील लोकांना वाहतुकीसाठी खूप सहन करावा लागत होता. फलटण तालुक्यातील ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे – पाटील व सुरवडीचे सरपंच जितेंद्र साळुंखे – पाटील यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कडे सातत्याने पाठपुरावा करत सदरील रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी केलेली होती. यावर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तातडीने कार्यवाही करित रस्त्याच्या डांबरीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला, अशी माहिती सुरवडीचे सरपंच जितेंद्र साळुंखे – पाटील यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!