दैनिक स्थैर्य | दि. ०६ नोव्हेंबर २०२४ | फलटण | माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून फलटण शहरासह मलठण भागांमध्ये प्रचंड प्रमाणावर विकास कामे मार्गी लागलेली आहेत. त्याचीच पोच पावती म्हणून गतकाही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मताधिक्य मिळालेले होते.
लोकसभा निवडणुकीपेक्षा जादाचे मताधिक्य यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार सचिन पाटील यांना देणार असल्याची ग्वाही माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी दिली.
मलठण येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार सचिन सुधाकर पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. त्यावेळी माजी नगरसेवक अशोकराव जाधव बोलत होते.
यावेळी फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. नरसिंह निकम, बाळासाहेब भोसले, हभप केशवराव जाधव, बाळासाहेब घनवट, बाळासाहेब अडसूळ, शरद सोनवणे, सुरेशराव जाधव, अनिकेत कदम, ओंकार गायकवाड, नितीन जगताप यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.