
स्थैर्य, निंभोरे, दि. २४: फलटण तालुक्यामधील निंभोरे गावच्या सरपंच पदी सौ. कांचन निंबाळकर तर उपसरपंचपदी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे स्वीय सहाय्यक मुकुंद रणवरे यांची निवड करण्यात आलेली आहे.
निंभोरे गावांमध्ये परिवर्तन करण्यासाठी मुकुंद रणवरे यांनी युवा कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन निंबोरे गावात सत्ता परिवर्तन घडवुन आणले. भाजपाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे विश्वासू सहकारी अमित रणवरे यांना धुळ चारत निंभोरे गावामध्ये विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली निंभोरे ग्रामपंचायतींमध्ये सत्ता परिवर्तन घडवून आणले.

