कोळकी गावच्या सरपंच पदी सौ. नाळे तर उपसरपंच पदी कामठे


स्थैर्य, कोळकी, दि.२४ : फलटण तालुक्यामधील सर्वात मोठी व फलटण शहराशेजारी वेगाने वाढत असलेल्या कोळकी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. विजया संदिप नाळे तर उपसरपंचपदी संजय बबन कामठे यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे.

सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे मतदान असलेले गाव म्हणजे कोळकी. कोळकी गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला स्पष्ट बहुमत मिळाले असून येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या भारतीय जनता पार्टीच्या श्रीराम पॅनेलने भोपळाही फोडण्यामध्ये यश आलेले नव्हते. कोळकी ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत राजे गटाचे 13 तर राजे गटाच्याच ४ बंडखोर उमेदवार व एक अपक्ष उमेदवार विजयी झालेले होते.


Back to top button
Don`t copy text!