
दैनिक स्थैर्य । 5 मार्च 2025। सोलापूर । सध्या देशाभरात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे.
परंतु काही शेतकर्यांच्या मोबाईलमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत पी.एम.किसान यादी किंवा पी.एम.किसान या मॅसेजची लिंक उघडताच शेतकर्यांच्या बँक खात्यात असलेली रक्कम गायब होत आहे.
तरी शेतकर्यांनी अशाप्रकारच्या फसव्या पीएम किसान अॅप्लीकेशन सावध राहण्याचे आवाहन सोलापूरचे जिल्हा अधिक्षक कृषीअधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.
शेतकर्यांनी मोबाईलवर पी.एम.किसान लिस्ट, किंवा पी.एम.किसान या संदेशाची लिंक उघडू नये किंवा सदर लिंकचा वापर शेतकर्यांनी करू नये, तसेच अशी काही घटना घडल्यास किंवा आढळून आल्यास त्वरित जवळच्या संबंधित सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवावी असे आवाहनही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भोसले यांनी केले आहे.