कल्लाप्पा आवाडे साहेबांनी जवळ घेताच पंढरीच्या विठुमाऊलीच्या कुशीत विसावल्याचा क्षणभर आनंद : डॉ. श्रीकांत मोहीते


दैनिक स्थैर्य । दि. २४ मे २०२२ । फलटण । श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सव सुरु असुन सन २०१८ – २०१९ या वर्षीचा श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार माजी खासदार व सहकारातील जाणते नेतृत्व कल्लाप्पा आण्णा आवाडे साहेब यांना सहकारमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते व विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रदान करण्यात आला. त्या कार्यक्रमा प्रसंगी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरी अग्रगण्य थोर नेते आदरणीय कल्लाप्पा आवाडे साहेब यांच्यामुळे माझ्यासह असंख्य लोकांना खुप मोलाचं सहकार्य करुन विविध प्रकारे मदत केली आहे. माझी कल्लाप्पा आवडे साहेबांना भेटण्याची खुप इच्छा होती योगायोगाने आज तो योग श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, मोहनराव नाईक निंबाळकर व विजयकुमार नेवसे या मान्यवरांमुळे जुळून आला. मी आवाडे साहेबांना भेटून त्यांना ३९ वर्षापूर्वीची जुणी आठवण सांगताच कल्लाप्पा आवडे साहेब यांनी मला जवळ ओढून घेत माझी आपुलकीने विचारपुस करत फोटो ही काढायला लावला. ज्यावेळी त्यांनी मला जवळ घेतले त्यावेळी क्षणभर पंढरीच्या विठू माउलींच्या कुशीत विसावल्याचा आनंद जाणवला. अश्या भावना माजी पशुप्रांत डॉ. श्रीकांत मोहिते यांनी व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!