स्थैर्य, फलटण, दि. १५ : फलटण तालुक्यामध्ये सध्या कोरोनाचे रुग्ण हे मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोना केअर सेंटर सुरु करणे गरजेचे आहे. या बाबत विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या आदेशानुसार साठे, ता. फलटण येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयामध्ये १०० बेड्सचे संस्थामक विलीगीकरण कक्ष सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती खटकेवस्ती ग्रामपंचायतीचे सरपंच बापूराव गावडे यांनी दिली.
साठे, ता. फलटण येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयामध्ये १०० बेड्सचा संस्थामक विलीगीकरण कक्ष उभारण्यात येत आहे. ह्या संस्थामक विलीगीकरण कक्षाची पाहणी पंचायत समितीचे सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर – निंबाळकर, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे – पवार यांनी केली.
साठे, ता. फलटण येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयामध्ये १०० बेड्सचा संस्थामक विलीगीकरण कक्षामध्ये दाखल केले जाणाऱ्या नागरिकांना चहा, नास्ता व जेवण हे आम्ही मोफत उपलब्ध करून देणार आहोत, अशी ग्वाही खटकेवस्ती ग्रामपंचायतीचे सरपंच बापूराव गावडे यांनी दिली.
साठे, ता. फलटण येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय हे कोरोना बाधित रुग्णांची सेवा करण्यासाठी दत्तात्रय शेंडे यांनी मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे.